भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील दुसर्या टी -20 (T-20) सामन्यात खेळाडूंना (Players) पदार्पण करण्याची संधी देण्यात आली होती. त्यात देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal), ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad), नितीश राणा (Nitish Rana) आणि चेतन सकरिया (Chetan Sakaria) यांचा सहभाग होता. विशेष म्हणजे टी -20 आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला सुरुवात करणारे नितीश राणा याला गोलंदाज कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) डेब्यू कॅप दिली होती. भारतीय क्रिकेटपटू व भाष्यकार संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) हे खेळाडूंवरील कठोर टीकेसाठी प्रसिद्ध आहेत. संजय मांजरेकर यांनी टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पणासाठी टीम इंडियाची (Team India) कॅप नितीश राणा याच्याकडे स्वत:च्या हातांनी दिली.
संजय मांजरेकर यांनी बुधवारी भाष्य करताना कुलदीप यादवला एक टोला लगावला आहे. मला आश्चर्य वाटते की जो खेळाडू स्वत: टीम इंडियामधून बाहेर जात आहे. तो खेळाडूंना पदार्पणाची कॅप सोपवितो. असे संजय मांजरेकर यांनी विधान केले आहे. संजय मांजरेकर यांची ही चर्चा लोकांना आवडली नाही. ट्विटरवरील चाहत्यांनी त्यांना लक्ष्य करत त्यांना याबद्दल प्रतिक्रिया द्यायला सुरूवात केली. मांजरेकरांचे हे विधान लोकांना आवडलेले नसून काही लोकांनी याबद्दल रागही व्यक्त केला आहे.
श्रीलंकेने दुसर्या टी -२० सामन्यात भारताला चार विकेट्सने पराभूत करून तीन सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली आहे. या सामन्यात भारताने देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, नितीश राणा आणि चेतन साकरिया यांना संधी दिली होती. ज्यांनी या सामन्यातून आंतरराष्ट्रीय टी 20 पदार्पण केले. या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत पाच गडी गमावून 132 धावा केल्या. भारताकडून कर्णधार शिखर धवनने 42 चेंडूंत पाच चौकारांच्या मदतीने 40 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेने 19.4 षटकांत 6 बाद 133 धावा करून सामना जिंकला.