COVID-19: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सचिन तेंडुलकर, पीव्ही सिंधू, सानिया मिर्झा समवेत दिग्गजांनी स्वीकारले WHO चे #SafeHands चॅलेंज, पाहा Videos
सचिन तेंडुलकर, पीव्ही सिंधू आणि हिमा दास (Photo Credit: Twitter)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) वाढत्या धोक्यामुळे आणि वेगवान प्रसार झाल्यामुळे आता जगभरात जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहेत. प्रत्येकजण आपापल्या स्तरावर लोकांना जागरूक करण्याचे आणि कोरोना टाळण्याचे मार्ग दर्शवित आहे. संपूर्ण जग कोरोनाच्या नियंत्रणाखाली आले आहे. चीनच्या वुहान शहरापासून सुरू झालेला कोरोना आतापर्यंत जगातील 140 हून अधिक देशांमध्ये पसरला आहे. भारतात 100 हुन अधिक जणांवर या व्हायरसचा परिणाम झाला आहे तर संपूर्ण विश्वात 7,000 हुन अधिक लोकांनी आपले प्राण गमावले आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organisation) एक विशेष मोहीम सुरू केली आहे. त्यांनी प्रत्येकाने साबणाने किंवा अल्कोहोलयुक्त सॅनिटायझरने आपले हात धुण्याचे आवाहन केले आहे. डब्ल्यूएचओने (WHO) कोरोनापासून बचाव करण्यासाठी सेफ हँड्स चॅलेंज सुरू केले आहे. आणि यामध्ये सामील होऊन लोकांनी त्यांचा व्हिडिओ शेअर करण्यास सांगितले. (Fight Coronavirus In Rahul Dravid Way! ट्विटर यूजरकडून द्रविड स्टाईल कोरोनाशी लढा देण्याचे टिप्स, पाहा Tweets)

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि हिमा दास (Hima Das) या दिग्गज भारतीय खेळाडूंनी हे सेफ हँड्स चॅलेंज स्वीकारले आहे. आरोग्याशी संबंधित आंतरराष्ट्रीय संस्थेने देखील एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे ज्यामध्ये लोकांना हात धुवायची प्रक्रिया सांगितली आहे. सर्वात पहिले भारताची पहिला स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू या मोहिमेशी जुडली. तिने हात धुतल्याचा आणि व्हिडिओ सामायिक करण्याचा व्हिडिओ बनवून क्रीडामंत्री किरेन रिजिजू, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि टेनिसपटू सानिया मिर्झा यांना आव्हान दिले आणि लोकांनाही आपले हात धुण्याचे आवाहन केले. पाहा हे व्हिडिओज:

सिंधू

सचिन तेंडुलकर

सानिया मिर्झाने तिचा मुलगा इझान मिर्झा मलिकबरोबर हात स्वच्छतेबाबत एक व्हिडिओही सामायिक केला आहे.

हिमा दास

किरेन रिजिजू

या सर्व दिग्गज व्यक्तींनी व्हिडिओद्वारे लोकांना हात धुण्याचे महत्त्व समजावून सांगितले आणि सर्वांना जागरूक करण्याचा प्रयत्न केला.भारतात कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या 137 वर पोहोचली आहे, तर त्यांना संपर्कात असलेल्या 5,700 पेक्षा जास्त लोकांना देखरेखीखाली ठेवले गेले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी (17 मार्च) पत्रकार परिषदेत माहिती दिली. यासह मंत्रालयाने कोरोना संसर्गातून आतापर्यंत 13 रुग्णांची सुटका करण्यात आली आहे, तर तिघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती दिली.