Russia-faces-4-Year-Olympic-Ban (Photo Credit: Getty Images)

जागतिक अँटी-डोपिंग एजन्सीने (WADA) कठोर पाऊल उचलत रशियावर चार वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या बंदीमुळे रशिया (Russia) 2020 टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympic) मध्ये भाग घेऊ शकणार नाही. या निर्णयाच्या विरोधात रशियाकडे अपील करण्यासाठी 21 दिवस असल्याचे वडाने म्हणाले. यापूर्वीही 2015 ते 2018 या काळात रशियावर तीन वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती. पुढील चार वर्षांसाठी रशियाला सर्व मोठ्या स्पोर्ट्स इव्हेंटमधून वगळण्याचा निर्णय वाडाकडून घेण्यात आला आहे. वाडाने रशियावर चार बंदी घातल्याने तो टोकियो ऑलिम्पिकसह कतारमधील 2022 फुटबॉल विश्वचषकात (FIFA World Cup) भाग घेऊ शकणार नाही. डोपिंग (Doping) डेटा हाताळण्यामुळे वाडाकडून हि कारवाही करण्यात आली. वाडाच्या या निर्णयावर रशियन अध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांनी संतप्त प्रतिक्रिया दर्शविली. (Russia Banned: रशिया ऑलिम्पिकसह कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेऊ शकणार नाही- WADA)

पॅरिसमध्ये बोलताना पुतीन यांनी ऑलिम्पिक सनदाचा "विरोध" करत निर्णय “राजकीयदृष्ट्या प्रेरित” असल्याची टीका केली. “रशियन ऑलिम्पिक समितीची निंदा करण्याचे काहीच नाही आणि या समितीकडे कोणतीही निंदा न झाल्यास देशाने स्वतःच्या ध्वजाखाली स्पर्धांमध्ये भाग घ्यावा,” असे पुतीन म्हणाले. रशियाचे पंतप्रधान दिमित्री मेदवेदेव यांनीही ही बंदी राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे म्हटले आहे. दम्यान, जर रशियाने या निर्णयाविरूद्ध अपील केले तर हे प्रकरण खेळासाठी लवाद न्यायालय (कॅस) कडे जाईल.

रशियन राज्य अधिकार्‍यांवर लागू करण्यात आलेल्या सर्वात कठोर बंदींमुळे सरकारी अधिकाऱ्यांना कोणत्याही मोठ्या कार्यक्रमात भाग घेण्यास मनाई केली जाईल, तर स्पर्धा होस्ट करण्याचा किंवा बोली लावण्याचा अधिकारही देश गमावेल. रशियाने 2014 च्या हिवाळी ऑलिम्पिकचे आयोजन केले होते. इतकेच नाही तर, मागील वर्षी रशियामध्येही 2018 चा फुटबॉल विश्वचषक खेळला गेला होता.