Rohit Sharma Net Worth: हैदराबादमध्ये अलिशान बंगला, 28 ब्रँड हाताशी, एका इन्स्टा पोस्टसाठी 75 लाख; विचारही केला नसेल इतकी आहे रोहित शर्माची वर्षिक कमाई
Rohit Sharma (Photo Credit - Twitter)

Rohit Sharma Net Worth : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा क्रिकेट क्षेत्रात अनेक तरूणांचा रोल मॉडेल आहे. त्याच्या शानदार खेळीमुळे चाहत्यांनी त्याना हिटमॅन हे नाव दिले आहे. मुंबईकर असलेल्या हिटमॅन रोहित शर्माचा आज वाढदिवस (Rohit Sharma Birthday)आहे. क्रिकेट क्षेत्रात तो अनेक तरूणांचा रोल मॉडेल आहे. मेहनतीच्या जोरावर रोहित शर्माने अनेक गोष्टी कमावल्या आहेत. अशातच त्याच्या एकूण संपत्तीची चर्चा नेहमीच असते. रोहीत शर्माची वार्षिक कमाई किती? (Rohit Sharma Net Worth)अशा गोष्टी नेहमीच गुगलवर सर्च केल्या जातात. चला जक जाणून घेऊयात रोहित शर्माची एकूण वार्षिक कमाई किती?

याशिवाय बीसीसीआयने त्याला A+ श्रेणीत ठेवले आहे. यामधून त्याला वर्षाला सात कोटी रुपये मानधम मिळत. याशिवाय 15 लाख रुपये मॅच फी बोर्डाकडून मिळते. वनडे सामना खेळण्यासाठी 6 लाख रुपये आणि टी-20 सामन्यासाठी 3 लाख रुपये मिळतात.रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा कर्णधार होता. तेव्हा त्याला 16 कोटी रुपये मानधन मिळत होते. एका रिपोर्ट्सनुसार, रोहितने आयपीएलमध्ये आतापर्यंत 178 कोटी रुपये कमावले आहेत.

जबरदस्त फॅन फॉलोइंगच्या जोरावर रोहित शर्माला फक्त देशातच नाही तर जगभरात प्रसिद्धी आहे. इंस्टाग्रामवर एक पोस्ट करण्यासाठी त्याला लाखो रूपये मिळतात. रोहित शर्माचे इंस्टाग्रामवर 37.9 मिलियन फॉलोअर्स आहेत. तो एका प्रमोशनल इन्स्टा पोस्टसाठी 75 लाख रुपये घेतो.

जाहिरातींमधून भरपूर कमाई करतो. सध्या तो जवळपास 28 ब्रँड त्याच्या हाताशी जोडले गेले आहेत. यामध्ये Jio Cinema, Max Life Insurance, Goibibo, CEAT Tyre, Hublot, Usha, Oppo, Highlander सारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. रोहित जाहिरातीसाठी सरासरी 5 कोटी कमावतो.याशिवाय रोहितने हैदराबादमध्ये एका बंगला खरेदी केला आहे, ज्याची किंमत जवळपास 5 कोटी रूपये असल्याची माहिती आहे. एकंदरीत माहिती घेतली तर रोहित शर्माचं नेट वर्थ 214 कोटी आहे.