Roger Federer बॉलीवूडच्या प्रेमात; पाहणार हे चित्रपट
Roger Federer (Photo: Twitter)

टेनिस खेळातील सर्वात पॉप्युलर नाव म्हणजे रॉजर फेडरर. विम्बल्डन चषक तब्बल ८ वेळा जिंकणारा हा जगप्रसिद्ध चॅम्पियन सध्या बॉलीवूडच्या भलत्याच प्रेमात पडला असल्याचे दिसून येते.

तो नेहमीच त्याच्या ट्विटर हॅन्डलद्वारे फॅन्सची संवाद साधत असतो. पण यावेळी मात्र त्याने खूपच वेगळा प्रश्न आपल्या फॅन्सना विचारला आहे.

त्याने आपल्या ट्विटर हॅन्डलवरून 'कोणता चित्रपट पाहावा... काही सजेशन? असा  प्रश्न विचारला असता, त्याला अनेक फॅन्सनी नावांची यादी दिली आहे.

परंतु रॉजरने नंतर एखाद्या  बॉलीवूड सिनेमाच्या नावाचे सजेशन मागितले आणि त्यावर उत्तर म्हणून एका फॅनने चक्क ४ बॉलीवूड सिनेमांची नावं रॉजरला सांगितली आहेत. त्यात शोले, लगान, जोधा अकबर आणि दंगल यासारख्या ब्लॉकबस्टर सिनेमांची नावे आहेत.

या नावांच्या यादीवर रॉजरने थँक्स म्हणत त्याच्या फॅनला उत्तर दिले आहे.