Rani Rampal: भारतीय महिला हॅाकी कर्णधार 'राणी रामपालचा'चा भारतीय पालकांना सल्ला
Rani rampal (Photo credit - Instagram)

भारतीय महिला हॉकी (Indian Woman's Hockey) संघाची २५ वर्षीय कर्णधार राणी रामपाल (Rani Rampal)  केवळ मैदानातील तिच्या कामगिरीसह तिच्या सोशल मीडियावरील (Social Media) पोस्टमुळेही नेहमीच चर्चेत असते. तिच्या फॉलोअर्ससाठी नेहमीच काही तरी चांगलं, प्रेरित करणारा संदेश ती देत असते. तिने आज सकाळी मुलींच्या पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची  आणि स्पष्ट मत व्यक्त करणारा एक मेसेज पोस्ट केला आहे. (हे ही वाचा IND vs NZ, ICC T20 World Cup 2021: न्यूझीलंडविरुद्ध संघात ‘या’ तडाखेबाज खेळाडूंची एन्ट्री, केन विल्यमसनच्या अडचणीत वाढ.)

पोस्ट मध्ये लिहिले आहे की  तुम्ही “तुमच्या मुलीला इतके सक्षम बनवा की, तिचे लग्न कोणाशी होईल याची काळजी करण्याची गरज नाही. तिच्या लग्नाच्या दिवसासाठी पैसे वाचवण्याऐवजी, तिच्या शिक्षणावर खर्च करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तिला लग्नासाठी तयार करण्याऐवजी स्वतःसाठी तयार करा. त्याला आत्म-प्रेम, आत्मविश्वास द्यायला शिकवा”

तिने केलेल्या पोस्ट मध्ये नेटिझनसने आपले सहमत दाखवले आहे. या पोस्टला आतापर्यंत २० हजारून जास्त लोकांनी पसंती दर्शवली आहे. अनेकांनी ही पोस्ट रीपोस्टही केली आहे. दरम्यान संमथा प्रभुने अशीच पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने  लग्न आणि मुलींबद्दल एक प्रेरणादायी पोस्ट शेअर केली होती.