Tokyo Olympics 2020: देशासाठी लढली आणि जिंकली! टोकियो ऑलिम्पिकमध्ये पी. व्ही. सिंधूला कांस्यपदक
पीव्ही सिंधू (Photo Credit: PTI)

PV Sindhu Wins Bronze Medal: भारताची स्टार बॅटमिंटनपटू पीव्ही सिंधूने (P. V Sindhu) टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आज (01 ऑगस्ट 2021) झालेल्या कांस्यपदकाच्या लढतीत (Bronze Medal) सिंधूने चीनच्या ही बिंग जिआओचा 21-13, 21-15 असा पराभव केला आहे. सिंधूचे हे ऑलिम्पिकमधील दुसरे पदक ठरले आहे. याआधी तिने रिओ ऑलिम्पिक 2016 मध्ये रौप्यपदक जिंकले होते. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे. या ऑलिम्पिकमध्ये मिराबाई चानुने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदकाची कमाई केली होती, त्यात आता सिंधूने भारताच्या झोळीत कांस्यपदक आणून ठेवले आहे.

पहिल्या डावात सिंधूने बिंग जिओला संधी दिली नाही आणि आघाडी कायम ठेवली. पी व्ही सिंधूने पहिल्या डावात 21-13 असा विजय मिळवला. त्यानंतर दुसऱ्या गेममध्ये देखील सिंधूने 11-8 अशी आघाडी घेतली आणि अखेर ही बिंग जिआओला 21-15 अशा फरकाने पराभूत केले आहे. काल (31 जुलै) झालेल्या उपांत्य फेरीतील लढतीत सिंधूचा पराभव झाला होता. त्यामुळे सुवर्णपदकाची संधी हुकली होती. पण आज सिंधूने निराश न करता भारताला कांस्यपदक जिंकून दिले आहे. हे देखील वाचा- Tokyo Olympics 2020: बॉक्सर लोव्हलिना बोर्गोहेनचे आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमाकडूंन कौतुक

ट्वीट-

टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर पी व्ही सिंधूवर कौतूकाचा वर्षाव केला जात आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह अनेक दिग्गजांनी पी व्ही सिंधूच्या विजयावर अभिमानस्पद प्रतिक्रिया दिली आहे.