PV Sindhu (File Photo)

जगातील सर्वाधिक कमाई करणार्‍या महिला खेळाडूंच्या यादीत स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही सिंधू (PV Sindhu) एकमेव भारतीय आहे. फोर्ब्सने (Forbes) मागील वर्षभरात सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. जगातील सर्वाधिक कमाई करणार्‍या महिला खेळाडूंमध्ये सिंधू 13 व्या स्थानावर आहे. फोर्ब्सने जगातील सर्वाधिक सर्वाधिक कमाई करणार्‍या 15 महिला खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. या यादीत अनुभवी टेनिस स्टार सेरेना विल्यम्स (Serene Williams) प्रथम स्थानावर आहे. फोर्ब्सने जाहीर केलेल्या 2019 मध्ये सर्वाधिक कमाई करणार्‍या महिला अ‍ॅथलीट्सच्या या यादीनुसार सिंधूची कमाई 5 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स (सुमारे 38 कोटी 86 लाख 87 हजार रुपये) आहे. फोर्ब्स म्हणाले, 'सिंधू भारतीय बाजारात कमाई करणारी आघाडीची महिला खेळाडू आहे. 2018 च्या अखेरीस बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्स जिंकणारी सिंधू पहिला भारतीय खेळाडू होती.

दरम्यान, मागील वर्षी अमेरिकन ओपन आणि यांचे ऑस्ट्रेलियान ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणारी जपानची नाओमी ओसाका (Naomi Osaka) हिने सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंमध्ये दिग्गज टेनिसपटू सेरेना विल्यम्सला टक्कर दिली आहे. ओसाकाने फोर्ब्सच्या यादीत सेरेनाचे पाठोपाठ दुसरे स्थान पटकावले आहे. ग्रँड स्लॅम स्पर्धेची 23 जेतेपदं नावावर असलेली सेरेनाची मागील वर्षाची कमाई ही 29.2 मिलियन अमेरिकन डॉलर (भारतीय रुपयांत 2,07,02,50,800) इतकी आहे. तर ओसाकाची कामे 24.3 मिलियन अमेरिकन डॉलर ( 1,72,23,71,850 ) इतकी आहे.

फोर्ब्सच्या या यादीत पहिल्या 15 खेळाडूंमध्ये 12 टेनिसपटू आहेत. अमेरिकेची महिला फुटबॉलपटू अ‍ॅलेक्स मॉर्गन (Alex Morgan) ही 12 व्या स्थानावर आहे. तिची कमाई 5.8 मिलियन आहे. तर 15व्या स्थानी थायलंडची गोल्फपटू अरिया जुतानुगर्न ( 5.3 मिलियन अमेरिकन डॉलर) आहे.