Photo Credit- X

PV Sindhu Paris Olympics 2024 : भारताची दिग्गज बॅडमिंटन खेळाडू पीव्ही सिंधू(,PV Sindhu)ने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ( Paris Olympic 2024) विजयी सुरुवात केली आहे. सिंधूने ग्रुप स्टेजच्या पहिल्या सामन्यात मालदीवच्या फतिमा नबाहा अब्दुल रज्जाकवर दमदार विजय मिळवला. अवघ्या 29 मिनिटांत सिंधूने फतिमा नबाहाचा पराभव केला. त्यामुळे दहावी मानांकित सिंधू या ऑलिम्पिकमध्ये सलग तिसऱ्यांदा पदक आपल्या नावावर करेल यात शंका नाही. (हेही वाचा: Paris Olympics Shooting: मनू भाकर महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र, रीदम सांगवान हिच्या पदरी निराशा)

भारतीय बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू आणि मालदीवचा फातिमा नब्बाह अब्दुल रज्जाक यांच्यातील सामना एकतर्फी झाला. पीव्ही सिंधूने पहिला सेट सहज जिंकला. तिने पहिला गेममध्ये अब्दुल रझाकचा 21-9 असा पराभव केला. सिंधूने पहिला गेम 13 मिनिटांत 21-9 असा जिंकला. दुसरा गेम 14 मिनिटांत 21-6 असा जिंकला. 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये सिंधूने रौप्य पदक जिंकले होते. त्यानंतर 2021 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकले होते. (हेही वाचा: Paris Olympics 2024 Google Doodle: पॅरिस फुटबॉल ऑलिंपिक गूगल डूडल, घ्या अधिक जाणून)

पीव्ही सिंधूचा फतिमा नबाहवर विजय

दुसऱ्या गेममध्ये मालदीवची फतिमा नबाहा अब्दुल रज्जाक पुनरागमन करेल असे वाटले होते. पण पीव्ही सिंधूने वरचढ ठरत गेम सहज जिंकला. आणि दुसरा गेम 21-6 अशा फरकाने जिंकून मोहिमेला सुरुवात केली. पीव्ही सिंधूने आता पुढील फेरीत प्रवेश केला.