Photo Credit- X

Paris Olympics Shooting: पॅरिस ऑलिम्पिकमधून भारतासाठी चांगली बातमी आहे. भारताच्या महिला नेमबाजांनी पहिल्याच दिवशी मेडलच्या आशा जागवल्या आहेत. मनू भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात अंतिम फेरी गाठली आहे. मनू भाकर हिने 60 शॉट्सच्या पात्रता फेरीत  580 गुण आणि 27 इनरसह टॉप 10मध्ये तिसरे स्थान पटकावले  (Manu Bhaker qualifies)आहे. तर दुसरीकडे रिदम सांगवान (Rhythm Sangwan)हिने 15 व्या स्थानावर राहिल्याने पात्रता फेरी गाठू शकली नाही. हंगेरियन वेरोनिका मेजर हिने 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये प्रशम स्थान पटकावले. ती 582-22 गुणांसह अव्वल साथानावर आहे. (हेही वाचा: Paris Olympics 2024: सरबज्योत सिंग आणि अर्जुन सिंग चीमा पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी अपात्र)

कोरीयाच्या ओह-ये-जीन हिने पात्रता फेरीत 580-22 गुणांसह तिसरे स्थान पटकावले आहे. भाकरने पहिल्या फेरीत 97, दुसऱ्यामध्ये 97, तिसऱ्यामध्ये 98, चौथ्यामध्ये 96, पाचव्यामध्ये 96 आणि सहाव्या फेरीत 96 गुण मिळवले. मनू भाकरचा अंतिम सामना उद्या म्हणजेच 28 जुलै रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता होणार आहे. मनू भाकरसाठी टोकियोमधील नेमबाजी स्पर्धेची अंतिम फेरी खूपच धक्कादायक आणि अनपेक्षित ठरली होती. (हेही वाचा: Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चीनने जिंकले पहिले सुवर्णपदक, 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत विजयी)

पोस्ट पहा

मेडल मिळण्याची खात्री असतानाच तिच्या पिस्तूलमध्ये ऐनवेळी तांत्रिक बिघाड झाला आणि ती अंतिमफेरीत पोहोचू शकली नाही. तिच्यासाठी आणि भारतासाठी ही खूपच धक्कादायक बाब होती. या प्रकारानंतर तिला अश्रू रोखता आले नव्हते. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत तिने चांगली कामगिरी करत आणि अंतिम फेरी गाठली आहे.