पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रीडा क्षेत्रातील 40 खेळाडूंसोबत घेतली बैठक, भारतातील कोविड-19 स्थितीवर सुरु आहे चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रीडा क्षेत्रातील 40 खेळाडूंसोबत घेतली बैठक (Photo Credits: ANI)

भारतात (India) कोरोना व्हायरस (Coronavirus) पॉसिटीव्ह रुग्नांची संख्या 2 हजारावर पोहचली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) देशातील स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. देशात सध्या 21 दिवसांचे लॉकडाउन असल्याने पंतप्रधान मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly), सचिन तेंडुलकर, हिमा दास, पीव्ही सिंधू (PV Sindhu), महिला हॉकी कर्णधार रानी रामपाल (Rani Rampal) यांच्यासह विविध क्रीडा क्षेत्रातील 40 खेळाडूंसोबत संवाद साधला. कोविड-19 चा प्रादुर्भाव झाल्यापासून पंतप्रधानांनी पहिल्यांदाच देशातील क्रीडा मंडळाच्या प्रमुख आणि खेळाडूंची भेटत घेतली. गांगुली, सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सहवाग आणि विराट कोहली यांच्यासारखे नामांकित क्रीडा व्यक्तिमत्त्व मागील अनेक दिवस कोरोना आणि लॉकडाउन बाबत जागरूक करण्याचा आपल्या परीने प्रयत्न करीत आहे. (5 एप्रिलला रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी एक दिवा लावा, कोरोनाच्या अंध:काराला दूर करण्यासाठी एकजूट दाखवा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन)

याआधी, कोरोनाच्या काळात मोदींनी देशवासीयांसह 12 मिनिटांचा व्हिडिओ संदेश शेअर केला. ते म्हणाले की कोरोनाविरूद्ध 9 दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये लोकांनी आतापर्यंत शिस्त दर्शविली आहे. रविवारी, 5 एप्रिलला रात्री 9 वाजता, आपण सर्व दिवे 9 मिनिटांसाठी बंद करा आणि मेणबत्ती, फ्लॅशलाइट, दिवा किंवा मोबाइल फ्लॅश लाईट लावा. 16 दिवसांत मोदींनी जनतेला तिसऱ्यांदा संबोधीत केले. भारतासह अनेक देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. गुरुवारपर्यंत जगभरात कोरोना व्हायरसच्या घटनांमध्ये 1 दशलक्षाहून अधिक लोकांची पॉसिटीव्ह नोंद झाली असून 52,000 पेक्षा जास्त मृत्यूची नोंद झाली आहे.

पंतप्रधान मोदींनी अलीकडेच पीएम-केअर्स फंडामध्ये योगदान दिल्याबद्दल आणि कोविड-19 विरूद्ध लढाईत पाठिंबा दिल्याबद्दल क्रीडा बंधूचे आभार मानले. भारताचा कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा, महिला क्रिकेट संघाची वनडे कर्णधार मिताली राज यांनी सरकारला कोरोनाविरोधात लढाईत मदत जाहीर केली. बीसीसीआयसह मुख्य भारतीय क्रीडापटूंनी कोरोना विषाणूविरूद्ध लढा देण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. या लढतीत बीसीसीआयने 51 कोटींची मदत केली होती. कोरोनाविरूद्ध लढा देण्यासाठी सचिन, सुरेश रैना, गौतम गंभीर, सिंधू, अजिंक्य रहाणे यांच्यासह अनेक क्रीडापटूंनी निधी दान केला आहे.