ICC T20 Ranking: पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आयसीसीच्या टी20 क्रमवारीत अव्वल स्थानावर, विराट कोहलीचा मोडला विक्रम
बाबर आजम (Photo Credit: Twitter/ESPNcricinfo)

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) त्याच्या उत्कृष्ट फॉर्ममुळे दीर्घकाळापासून T20 क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. आयसीसीच्या (ICC) ताज्या क्रमवारीत बाबर आझमने भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) मागे टाकत विशेष स्थान मिळवले आहे. बाबर आझम टी-20 क्रमवारीत (ICC T20 Ranking) सर्वाधिक काळ खेळणारा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली 1013 दिवस टी-20 क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र आता पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने हा विक्रम मोडीत काढला आहे. बाबर आझम 1014 दिवस टी-20 क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा फलंदाज राहिला आहे.

बाबर आझम सध्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये जगातील पहिल्या क्रमांकाचा फलंदाज आहे. बाबर आझम 818 गुणांसह T20 क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. एकदिवसीय क्रमवारीत बाबर आझम 892 गुणांसह अव्वल स्थानावर आहे.  मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सध्या कोणताही खेळाडू बाबर आझमला पराभूत करताना दिसत नाही. टी-20 क्रमवारीत पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान 794 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. हेही वाचा Malaysia Open Super 750 स्पर्धेत पीव्ही सिंधूचा विजय, तर सायना नेहवालचा पहिल्या फेरीतच पराभव

दक्षिण आफ्रिकेचा मार्कराम 757 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. ताज्या क्रमवारीत आयर्लंडविरुद्ध मोठी खेळी न खेळण्याचा फटका भारताच्या इशान किशनला सहन करावा लागला आहे. ताज्या क्रमवारीत भारताच्या इशान किशनची दोन स्थानांची घसरण झाली आहे. इशान किशन 683 गुणांसह सातव्या स्थानावर आहे. टॉप 10 फलंदाजांच्या यादीत इशान किशनशिवाय एकाही भारतीय फलंदाजाचा समावेश नाही.