Neeraj Chopra Javelin Stolen: भालाफेक या क्रीडा प्रकारात विश्वविजेतेपद पटकलेल्या निरज चोप्रा (Neeraj Chopra) याच्या पुतळ्यावरुन भाला (javelin) चोरी झाल्याचे वृत्त आले आणि एकच खळबळ उडाली. सोशल मीडियावर अनेकांनी दावा केला की निरज चोप्रा याचा भाला चोरीला गेला आहे. मेरठ शहरातील आपुड अड्डा चौकात ही घटना घडली. ज्या ठिकाणी त्याचा पुतळा बसविण्यात आला आहे. अनेकांनी दावा केला की मूर्तीवर असलेला लोखंडी भाला चोरुन अज्ञाताने त्या ठिकाणी लाकडाचा भाला ठेवला. पण व्हायरल झालेल्या या वृत्तामागचे वास्तव काही वेगळेच होते. जे मेरठ विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी पुढे आणले आणि भालाचोरीच्या वृत्ताचे खंडणही केले.
त्याचे झाले असे की, हापुड अड्डाचौकाचा काही दिवसांपूर्वीच प्रशासनाने कायापालट केला. या ठिकाणी शुशोभीकरणासह नीरज चोप्रा याचा भाला फेकतानाचा एक पुतळाही उभारला. मेरठला स्पोर्ट सीटी म्हणून प्रमोट करण्यासाठी हा सगळा खटाटोप करण्यात आला होता. दरम्यान, सोमवारी रात्री अज्ञाताकडून या पुतळ्यावरील भाला गायब करण्यात आला. मूळ खरा लोखंडी भाला बदलून त्या ठिकाणी लाकडी भाला ठेवण्यात आला. चौकात शहर पोलीस नियमीत गस्त घलतात. असे असतानाही भाला चोरी झाल्याने आणि बदलण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. या घटनेची प्रसारमाध्यमांनीही दखल घेतली. विविध ठिकाणी बातम्या आल्या. सोशल मीडियावर टीका टिपण्णी झाली.
ट्विट
मेरठ - विश्व चैंपियन नीरज चोपड़ा के स्टैच्यू का भाला चोरी, हापुड़ अड्डे पर स्पोर्ट्स सिटी प्रमोशन को लगा स्टैच्यू, एक मंजिल ऊंचाई पर लगे स्टैच्यू का भाला चोरी हुआ, पुलिस पेट्रोलिंग के बाद भी बाजार से चोरी हुआ भाला. pic.twitter.com/GP7dl4d0Iy
— भारत समाचार | Bharat Samachar (@bstvlive) September 5, 2023
दरम्यान, परिसरातील प्राधिकरण अभियंता खंड पवन भारद्वाज यांनी म्हटले आहे की, सुरुवातीला प्राधिकरणाने या पुतळ्याला प्लास्टिकचा भाला लावण्यात आला होता. जो ऑलंपीयन नीरज चोपडा यांच्या दोन्ही हातात होता. दरम्यान, जिल्हा उद्योग बंधूंच्या एका बैठकीत काहींनी त्यावर आक्षेप घेतला. त्यामुळे मग पुन्हा त्यात बदल करण्यात आला. सूरजकुंड येथून खरा भाला (लोखंडी) खरेदी करण्यात आला. जो तीन महिन्यांपूर्वी लावण्यात आला होता. दरम्यान, आज सकाळी हा भाला चोरीस गेल्याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळाली. पण, पोलिसांनी अधिकाऱ्यांना घेऊन घटनेची पडताळणी आणि वस्तुस्थिती समजून घेतली. तेव्हा सत्य समोर आले की, हा खराच भाला आहे. जो प्राधिकरणाने तीन महिन्यांपूर्वी बदलला आणि लावला होता.