लिव्हरपूलचा (Liverpool) डिफेंडर व्हर्जिन व्हॅन डिजक (Virgil van Dijk) याने लिओनेल मेस्सी (Lionel Messi) आणि क्रिस्टियानो रोनाल्डो (Cristiano Roaldo) यांचा पराभव करून युईएफए (UEFA) मेन्स प्लेयर ऑफ दी इयर अवॉर्ड 2018-19 जिंकला आहे. गेल्या 12 महिन्यांत आपल्या देश आणि क्लबसाठी जे साध्य केले त्याबद्दल व्हर्जिकला हा पुरस्कार देण्यात आला. लिव्हरपूलने गेल्या हंगामात मॅड्रिडमध्ये व्हर्जिकच्या मदतीने चॅम्पियन्स लीगचे जेतेपद जिंकले होते. त्याने युईएफए नेशन्स लीग फायनलमध्ये नेदरलँड्सचे प्रतिनिधित्व केले असून त्याच्या टीमला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. व्हर्जिनने यूईएफए चॅम्पियन्स लीग डिफेंडर ऑफ द सीझनच्या पुरस्कारावरही आपले नाव लिहिले. तर, लिओनेल मेस्सी याला यूईएफए फॉरवर्ड ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार जिंकणारा मेस्सी हा पहिला खेळाडू आहे.
यापूर्वी, अर्जेंटिनाचा लिओनल मेसी, पोर्तुगालचा क्रिस्टियानो रोनाल्डो आणि नेदरलँड्सचा वानझिक व्हॅन डाय यांना युईएफए मेन प्लेयर ऑफ दी इयर अवॉर्डसाठी निवडले गेले होते. युरोपियन फुटबॉल असोसिएशनने गुरुवारी सर्व पुरस्कार जाहीर केले. दुसरीकडे, इंग्लंडच्या ल्युसी ब्रॉन्झ (Lucy Bronze) हिला वुमेन्स प्लेअर ऑफ दी इयर घोषित केले गेले. तिने आपल्या लिओन सोबती अॅडा हेगरबर्ग आणि अमांडाईन हेन्रीचा पराभव करत हा मान मिळवला. हा पुरस्कार मिळविणारी ती पहिली इंग्रजी महिला ठरली.
✨ 2018/19 UEFA Men's Player of the Year ✨
🏆 𝐕𝐀𝐍 𝐃𝐈𝐉𝐊#UEFAawards | #UCLdraw pic.twitter.com/B6PurZkmK7
— #UCLdraw (@ChampionsLeague) August 29, 2019
यूईएफएनुसार गेल्या हंगामातील हे आहेत पहिले 10 खेळाडू:
1 व्हर्जिन व्हॅन डिजक (लिव्हरपूल आणि नेदरलँड्स) - 305 गुण
2 लिओनेल मेस्सी (बार्सिलोना आणि अर्जेंटिना) - 207 गुण
3 क्रिस्टियानो रोनाल्डो (जुव्हेंटस आणि पोर्तुगाल) - 74 गुण
5 सॅडिओ मॅन (लिव्हरपूल आणि सेनेगल) - 51 गुण
6 मोहम्मद सालाह (लिव्हरपूल आणि इजिप्त) - 49 गुण
7 एडन हॅजार्ड (चेल्सी / रियल माद्रिद आणि बेल्जियम) - 38 गुण
8 मॅथिज डी लिग्ट (अजॅक्स / जुव्हेंटस आणि नेदरलँड्स) - 27 गुण
8 फ्रेन्की डी जोंग (अजाक्स / बार्सिलोना आणि नेदरलँड्स) - 27 गुण
10 रहीम स्टर्लिंग (मँचेस्टर सिटी आणि इंग्लंड) - 12 गुण