भारताची कुस्तीपटू विनेश फोगटने कुस्तीच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. उपांत्य फेरीत विनेश फोगटचा सामना क्युबाच्या युस्नेलिस गुझमन लोपेझशी झाला होता. या सामन्यात विनेश फोगटने 5-0 असा विजय मिळवला आणि अंतिम फेरी गाठली. मात्र,अनुज्ञेय वजन मर्यादेपेक्षा अंदाजे 100 ग्रॅम असल्याने तीला 50 किलो गटासाठी अपात्र करण्या आले, हा भारतासाठी मोठा धक्का मानला जात आहे. विनेश फोगटने याविरोधात आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडे (CAS) दाद मागितली आहे. आहे. सीएएस (Court of Arbitration for Sport) विनेशच्या याचिकेवर आज सुनावणी करणार आहे. (हेही वाचा - Vinesh Phogat Retires: 'कुस्ती जिंकली, मी हरले आता माझ्यात ताकद नाही'; विनेश फोगाट ने भावनिक पोस्ट लिहित जाहीर केली निवृत्ती)
भारताकडून ज्येष्ठ विधीज्ञ हरिश साळवे हे विनेशची व भारतीय ऑलिम्पिक समितीची बाजू मांडणार आहेत. भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता याप्रकरणी सुनावणी होईल. उपांत्य फेरीत 5-0 अशा फरकाने विजय मिळवणारी विनेश ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली होती. भारतीय ऑलिम्पिक समितीने आपली बाजू मांडण्यासाठी भारतीय वकिलांची नियुक्ती करण्यासाठी वेळ मागितला होता. त्यानंतर ही सुनावणी एक दिवस पुढे ढकलण्यात आली. हरिश साळवे हे व्हर्च्युअल पद्धतीने या सुनावणीसाठी उपलब्ध असतील.
विनेश फोगटने आता तिला संयुक्त रौप्य पदक मिळावं अशी मागणी आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडे केली आहे. अंतिम फेरीत सामील करून घेण्याच्या आवाहनावर, सीएएसने सांगितले की ते अंतिम सामना थांबवू शकत नाहीत, त्यानंतर फोगटने संयुक्त रौप्य पदकाची मागणी केली. आता CAS या प्रकरणावर गुरूवारी 8 ऑगस्टला अंतिम निकाल जाहीर आहे.