Vinesh Phogat (PC - ANI/Twitter)

Vinesh Phogat CAS Hearing: पॅरिस ऑलिम्पिक (Paris Olympics 2024) मधून अपात्र ठरलेल्या विनेश फोगट (Vinesh Phogat) ला पदक मिळणार की नाही याचा निर्णय आज रात्री होणार आहे. ऑलिम्पिकमधील कुस्ती स्पर्धेत 50 किलो गटाच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या विनेश फोगटचे वजन 100 ग्रॅमने जास्त होते, त्यानंतर तिला अपात्र ठरवण्यात आले. आता विनेशने या निर्णयाला विरोध केला असून त्याविरोधात कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट (CAS) मध्ये केस दाखल केली आहे. आता याबाबतचा निर्णय आज रात्री 9.30 वाजता होणार आहे.

हरीश साळवे लढत आहेत विनेश फोगटचा खटला -

IOA ने माजी सॉलिसिटर जनरल आणि ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांची विनेश फोगटचा खटला कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट (CAS) मध्ये लढण्यासाठी नियुक्त केला आहे. आता विनेशला हरीश साळवे यांनी खटला जिंकून पदक मिळण्याच्या आशा आहेत. विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिक 2024 रौप्य पदक मिळेल का? याचं उत्तर अखेर आजच्या सुनावणीत मिळणार आहे. (हेही वाचा - Vinesh Phogat Disqualified: विनेश फोगट अपात्र, वाढत्या वजनाचे निमित्त; Paris Olympics 2024 मध्ये भारताला मोठा धक्का)

दरम्यान, सीएएसने शनिवारी दुपारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'सीएएस विभागाच्या अध्यक्षांनी पॅनेलला 9.30 मिनिटांनी आपला निर्णय देण्यास सांगितले आहे.' भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन कुस्तीपटू विनेश फोगटच्या वजनाच्या विरोधात कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट (CAS) च्या तदर्थ विभागासमोर फोगटच्या अर्जावर सकारात्मक निर्णयासाठी आशावादी आहे, असं IOA ने शुक्रवारी एका निवेदनात म्हटले आहे. (हेही वाचा - Vinesh Phogat Retires: 'कुस्ती जिंकली, मी हरले आता माझ्यात ताकद नाही'; विनेश फोगाट ने भावनिक पोस्ट लिहित जाहीर केली निवृत्ती)

हरीश साळवे आणि विदुष्पत सिंघानिया या ज्येष्ठ वकीलांनी विनेशची बाजू मांडली आहे. उपांत्य फेरीत मंगळवारी विनेशकडून पराभूत झालेल्या क्युबाची कुस्तीपटू युस्नेलिस गुझमन लोपेझ हिने अव्वल स्थान पटकावले. लोपेझसह विनेशला संयुक्त रौप्यपदक मिळावे, अशी विनंती अपीलामध्ये करण्यात आली आहे.