सुमित नागल (Photo Credit: @Wowtsal/Twitter)

[Poll ID="null" title="undefined"]भारताच्या सुमित नागल (Sumit Nagal) याने या वर्षाची अंतिम ग्रँड स्लॅम, यूएस ओपन (US Open) टेनिस स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश केला. पात्र फेरीच्या अंतिम सामन्यात नागालने ब्राझीलच्या जाओ मेंगेस (Joao Menezes) याचा तीन सेटमध्ये पराभव केला. यासह, वयाच्या 25 व्या वर्षी कोणत्याही ग्रँड स्लॅम स्पर्धेमुख्य फेरी गाठणारा सुमित पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. 2015 विम्बल्डन कनिष्ठ अजिंक्यपद विजेता सुमितने अमेरिकेच्या खेळातील सुवर्णपदक विजेता ब्राझीलच्या मेनेझेसचा अंतिम सामन्यात 5-7,6 -4, 6-3 ने पराभव केला. जागतिक क्रमवारीत सुमित 190 व्या क्रमांकावर आहे. 27 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या यूएस ओपन स्पर्धेच्या पहिल्या फेरीत सुमितचा सामना जागतिक क्रमवारीत तिसरे मानांकन प्राप्त रॉजर फेडरर (Roger Federer) याच्याशी होईल.

22 वर्षीय माजी जुनिअर विम्बल्डन चॅम्पियन नागलेने पहिला सेट 5-7 ने गमावला. ब्राझीलच्या खेळाडूने दुसर्‍या सेटमध्येही 4-1 अशी आघाडी घेतली होती, पण त्यानंतर नागालने शानदार पुनरागमन केले. त्याने सलग पाच गेम जिंकत सेट 6-4 असा जिंकला आणि सामना 1-1 अशी बरोबरीत रोखला. सामन्यानंतर नागलने मागे वळून पाहिले नाही आणि निर्णायक सेट 6-3 ने जिंकून मुख्य फेरीत प्रवेश केला. पात्रता टप्प्यात यापूर्वी त्याने जपानच्या तात्सम इटो आणि पोलंडच्या पीटर पोलान्स्की याचा सरळ सेटमध्ये पराभव केला होता.

दरम्यान, याआधी भारताच्या प्रजनेश गुन्नेस्वरन यानेदेखील मुख्य फेरीसाठी पात्रता मिळवली. पहिल्या फेरीत त्यांचा सामना सोमवारी सिनसिनाटी मास्टर्स विजेता डॅनिल मेदवेदेव याच्याशी होईल. यापूर्वी त्याने ऑस्ट्रेलियन ओपनच्या मुख्य फेरीत प्रवेश केला होता. 1998 नंतर प्रथमच दोन भारतीय खेळाडूंनी ग्रँड स्लॅम स्पर्धेत पुरुष एकेरीच्या मुख्य फेरीत प्रवेश केला आहे. 1998 मध्ये महेश भूपती आणि लिअँडर पेस यांनी विम्बल्डन टेनिसच्या पुरुष एकेरीत भाग घेतला होता.