मरियप्पन थंगावेलू (Photo Credit: Facebook)

Tokyo Paralympics 2020: टोकियो पॅरालिम्पिक खेळाच्या उद्घाटन (सोहळ्यात (Tokyo Paralympics Opening Ceremony) भारताचा ध्वजवाहक, मरियप्पन थंगावेलु (Mariyappan Thangavelu), उड्डाण दरम्यान कोविड-19 संभाव्य संपर्कात आल्यानंतर उद्घाटन समारंभाचा भाग होणार नाही. आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेता टेक चंद (Tek Chand) मरियप्पनच्या जागी भारताचा नवीन ध्वजधारक म्हणून नियुक्त केले गेले आहे. टोकियोला (Tokyo) जाताना मरियप्पन एका कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने हा बदल करण्यात आला आहे. सध्या मरियप्पनला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले असून 6 दिवस त्याची कोरोना चाचणी करण्यात आली ज्याचा रिपोर्टही निगेटिव्ह आला आहे. मात्र तरीही सुरक्षेच्या कारणास्तव मरियप्पन उद्घाटन समारंभात भाग घेणार नाही. भारतीय पॅरालिम्पिक समितीने (India Paralympics Committee) एक निवेदन जाहीर करून याबाबत औपचारित घोषणा केली आहे. (Tokyo Paralympics 2020 Live Streaming: पॅरालिम्पिक उद्घाटन सोहळ्याची तारीख, भारतीय वेळ, आणि थेट प्रक्षेपण कधी व कुठे पाहणार?)

टोकियो पॅरालिम्पिक्स खेळाचा उद्घाटन समारंभ आज भारतीय वेळेनुसार दुपारी 4 वाजता सुरु होणार आहे. भारतीय पॅरालिम्पिक्स कमिटीने भारताकडून आधी ध्वजवाहक म्हणून मरियप्पनच्या नावाची घोषणा केली होती. पण आता टेक चंदला हा मान देण्यात आला आहे. 2019 मध्ये वर्ल्ड पॅरा एथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये तिसऱ्या स्थानावर राहत मरियप्पनने टोकियो येथे पॅरालिम्पिक्स खेळाची पात्रता मिळवली होती. दरम्यान, यापूर्वी 2020 पॅरालिम्पिक उद्घाटन समारंभात पाच पॅरा-अॅथलीट आणि सहा अधिकाऱ्यांना भाग घेण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती आधी मिळावी होती. यामध्ये मरिअप्पन व्यतिरिक्त, इतर खेळाडू ज्यांना जपानी आरोग्य अधिकाऱ्यांनी 'जवळचे संपर्क' म्हणून ओळखले आहे त्यामध्ये - लावण्या स्वस्तिक सिरसीकर, सोमबीर सिंह, विनोद कुमार, अभिषेक संजीव वाघ आणि मोहम्मद दानिश यांचा समावेश आहे.

पुरुषांच्या हाय-जंप F42 स्पर्धेत भाग घेणाऱ्या मरियप्पनला प्रशिक्षण घेण्याची परवानगी देण्यात आली आहे परंतु विशिष्ट वेळ आहे. 24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरपर्यंत पार पडणाऱ्या या खेळांमध्ये स्टार भालाफेक फेकणारा देवेंद्र झाझारिया आणि हाय जम्पर मरियप्पन थंगावेलू - 2016 च्या रिओ पॅरालिम्पिक सुवर्ण विजेते - भारताला पाच सुवर्णांसह किमान 15 पदकांची अपेक्षा असलेल्या सर्वात मोठ्या तुकडीचे नेतृत्व करेल. दरम्यान, यंदाच्या पॅरालिम्पिक्समध्ये भारत नऊ खेळांमध्ये भाग घेत आहे. पॅरालम्पिक खेळात भारताने पहिल्यांदा 1972 मध्ये भाग घेतल्यापासून एकूण 12 पदके जिंकली आहेत.