Tokyo Paralympics 2020 Games Live Streaming: टोकियो पॅरालिम्पिक (Tokyo Paralympics) 24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर दरम्यान आयोजित केले जाईल. जपान (Japan) सरकारने राजधान टोकियो येथे कोविड-19 आणीबाणी (COVID19 Emergency) उपाययोजना लांबवल्याने पॅरालिम्पिक खेळ प्रेक्षकांशिवाय होणार आहेत. पॅरालिम्पिक स्पर्धांमध्ये पोहणे, टेबल टेनिस, व्हीलचेअर फेन्सिंग आणि बास्केटबॉल यांचा समावेश आहे, ज्यात विविध अपंगत्व असलेले 4,000 पेक्षा अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. बहुतेक खेळ ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकमध्ये सामान्य आहेत, ज्यात अॅथलेटिक्स आणि पोहणे समाविष्ट आहे. बोकीया आणि गोलबॉल हे दोन खेळ पॅरालिम्पिकसाठी अद्वितीय आहेत. दरम्यान पॅरालम्पिक खेळांपूर्वी होणाऱ्या उद्घाटन सोहळ्याबाबत आज आपण सर्व महत्वपूण माहिती जाणून घेणार आहोत. (Tokyo Paralympics 2020 Opening Ceremony: भारतीय दलाचे 5 खेळाडू, 6 अधिकारी पॅरालिम्पिक उद्घाटन सोहळ्यात घेणार भाग)
युरोस्पोर्टसह भारतातील पॅरालिम्पिक खेळांना मोठ्या प्रमाणात चालना देण्यासाठी राष्ट्रीय नेटवर्क दूरदर्शन भारतात टोकियो पॅरालिम्पिक 2020 चे थेट प्रसारण करणार आहे. 24 ऑगस्टपासून सुरू होणारा हा कार्यक्रम राष्ट्रीय केबलद्वारे सर्व केबल आणि डीटीएच प्लॅटफॉर्मवर थेट प्रसारित केला जाईल. टोकियो पॅरालिम्पिकचा उद्घाटन सोहळा 24 ऑगस्ट रोजी स्थानिक वेळेनुसार सकाळी 7 वाजता आणि भारतीय वेळेनुसार दुपारी 4:30 वाजता सुरु होईल. टोकियो पॅरालिम्पिक 2020 चे प्रसारण युरोस्पोर्ट चॅनेलवर केले जाईल. युरोस्पोर्ट चॅनेल आता डिस्कव्हरी+ अॅपवर स्ट्रीम केले जाऊ शकते. तसेच दूरदर्शन टोकियो पॅरालिम्पिक्स लाईव्ह देखील प्रसारित करेल पण फक्त टोकियो पॅरालिम्पिकमधील भारतीय कार्यक्रमांचे थेट प्रसारण DD चॅनेलवर उपलब्ध असेल.
टोकियो येथे यशस्वी ऑलिम्पिक खेळांनंतर, बहुप्रतिक्षित पॅरालिम्पिक खेळांची वेळ आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार उद्घाटन समारंभाची मुख्य संकल्पना “We Have Wings” आणि ही थीम व कामगिरीचा भाग म्हणून प्रदर्शित केले जाईल. तसेच एकूण 75 लोक या सोहळ्यात सादरीकरण करतील आणि सर्वात लहान कलाकार 11 वर्षांचा असेल. दुसरीकडे, भारत 25 ऑगस्टपासून पॅरा टेबल टेनिससह आपल्या मोहिमेची सुरुवात करेल जिथे भाविना पटेल आणि सोनल पटेल आव्हान देताना दिसतील.