Tokyo Paralympics 2020 Opening Ceremony: पॅरालंम्पिक उद्धाटन सोहळ्याची दिमाखात सुरुवात, Tek Chand यांनी केले सर्वात मोठ्या भारतीय दलाचे नेतृत्व
टेक चंद (Photo Credit: PTI)

Tokyo Paralympics 2020 Opening Ceremony: जपानची राजधानी टोकियो (Tokyo) येथे आजपासून पॅरालम्पिक स्पर्धांना (Paralympic Games) सुरुवात झाली आहे. करोनाव्हायरस महामारीमुळे ऑलिम्पिक स्पर्धा एक वर्षासाठी स्थगित करण्यात आल्या होत्या. पण एका वर्षानंतर स्पर्धेचे आयोजन केले जात आहेत. आज या स्पर्धेच्या उद्धाटन सोहळ्याची अतिशय दिमाखात सुरुवात झाली. रिओ पॅरालम्पिक पदक विजेता मरियप्पन थंगावेलु यंदाच्या टोकियो खेळाच्या उद्घाटन सोहळ्यात भारताचा ध्वज वाहक होता पण टोकियोला जाणाऱ्या विमानात कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे त्याला आयसोलेट करण्यात आले आणि त्याच्या जागी भालाफेकीपटू टेक चंदने (Tek Chand) भारताच्या सर्वात मोठ्या पॅरालंम्पियन दलाचे (India Paralympics Contingent) नेतृत्व केले. (Tokyo Paralympics 2020 India Schedule: भारतीय पॅरालिम्पिक दलाचे संपूर्ण वेळापत्रक- इव्हेंट्स, तारीखसह सर्व माहिती जाणून घ्या)

टोकियो येथे आयोजित पॅरालम्पिक खेळात यंदा एकूण 163 देश सहभागी होत आहेत. यामध्ये पाच देश पॅरालिम्पिक स्पर्धेत पदार्पण करत आहेत. तसेच रशिया ROC म्हणून स्पर्धा करताना दिसेल. शिवाय यंदा 4563 खेळाडू विविध खेळांमध्ये जलवा दाखवण्यासाठी उत्सुक असतील. 13 दिवसांच्या खेळादरम्यान 22 खेळांत एकूण 539 स्पर्धा आयोजित केल्या जातील. बहुतेक खेळ ऑलिम्पिक खेळांसारखे असतात आणि स्पर्धेत अनेक बदल केले गेले आहेत. बॅडमिंटनचा पहिल्यांदा पॅरालिम्पिक खेळांमध्ये समावेश करण्यात आला आहे. भारतातील 7 खेळाडूंनी बॅडमिंटनमध्ये विविध श्रेणींमध्ये पात्रता मिळवली आहे. भारताचे एकूण 54 खेळाडू टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सहभागी होत आहेत. पॅरालिम्पिक खेळांमध्ये भाग घेणारी ही भारताकडून आतापर्यंतची सर्वात मोठी तुकडी आहे. रिओ पॅरालिम्पिक दरम्यान भारताने पाच खेळांसाठी फक्त 19 खेळाडूंची तुकडी पाठवली होती, पण टोकियोमध्ये भारतीय खेळाडू नऊ वेगवेगळ्या खेळांमध्ये सहभागी होत आहेत.

टोकियो ऑलिम्पिक प्रेक्षकांशिवाय आयोजित करण्यात आले होती आणि पॅरालिम्पिक खेळ देखील त्याच प्रकारे खेळले जातील. टोकियोबाहेरील क्रीडा स्पर्धांमध्ये ऑलिम्पिक क्रीडा दरम्यान काही चाहत्यांना परवानगी देण्यात आली होती, परंतु यंदा कोणत्याही खेळांसाठी प्रेक्षकांना परवानगी दिली जाणार नाही. गेल्या काही काळात टोकियोमध्ये कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे आणि यामुळे खेळाडूंनाही संसर्ग होण्याचा धोका आहे त्यामुळे प्रेक्षकांच्या उपस्थितीवर बंदी घालण्यात आली आहे.