Tokyo Paralympics 2020 India Schedule: भारतीय पॅरालिम्पिक दलाचे संपूर्ण वेळापत्रक- इव्हेंट्स, तारीखसह सर्व माहिती जाणून घ्या
टोकियो पॅरालिम्पिक 2020 (Photo Credit: PTI)

Tokyo Paralympics 2020 India Schedule: टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) भारताच्या नेत्रदीपक कामगिरीनंतर आता पॅरालिम्पिक (Paralyians) खेळाडूंची दम दाखवण्याची वेळ आहे, जे पुढील आठवड्यापासून टोकियो येथे आयोजित पॅरालिम्पिक खेळांमध्ये (Paralympic Games) सहभागी होणार आहेत. 25 ऑगस्टपासून टोकियो पॅरालिम्पिक खेळात भारताची मोहीम सुरु होत आहे, जिथे टेबल टेनिसपटू आपली प्रतिभा दाखवताना दिसतील. पॅरालिम्पिक ऑलिम्पिक खेळात भारताची (India at Paralympic Games) कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे आणि यंदाही बरीच पदके खेळाडू जिंकतील अशी अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत, टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंचे (India Contingent) सामने कधी, केव्हा आणि कुठे होणार आहेत याची संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या. (Tokyo Paralympics 2020: अपंगत्व आणि समस्यांवर मात करून जगावर वर्चस्व गाजवण्यासाठी तयार पॅरालम्पियन, भारताच्या पदकांच्या दावेदारांबाबत घ्या जाणून)

टोकियो पॅरालिम्पिक 2020 मध्ये सहभागी होणारे भारतीय खेळाडूंच्या कार्यक्रम आणि तारखा

तिरंदाज, शुक्रवार, 27 ऑगस्ट

पुरुष रिकर्व्ह वैयक्तिक ओपन - हरविंदर सिंह, विवेक चिकारा

पुरुषांचे कंपाऊंड वैयक्तिक ओपन - राकेश कुमार, श्याम सुंदर स्वामी

महिलांचे कंपाऊंड वैयक्तिक ओपन - ज्योती बलियान

कंपाऊंड मिक्स्ड टीम ओपन - ज्योती बलियान आणि TBC

बॅडमिंटन बुधवार, 1 सप्टेंबर

पुरुष एकेरी SL3 - प्रमोद भगत, मनोज सरकार

महिला एकेरी SU5 - पलक कोहली

मिश्र दुहेरी SL3 -SU5 - प्रमोद भगत आणि पलक कोहली

गुरुवार, 2 सप्टेंबर

पुरुष एकेरी SL4 - सुहास लालिनाकेरे यतीराज, तरुण ढिल्लन

पुरुष एकेरी SS6 - कृष्णा नगर

महिला एकेरी SL4 - पारुल परमार

महिला दुहेरी एसएल 3 -एसयू 5 - पारुल परमार आणि पलक कोहली

पॅरा कॅनोइंग, गुरुवार, 2 सप्टेंबर

महिलांची VL2 - प्राची यादव

पॉवरलिफ्टिंग, शुक्रवार, 27 ऑगस्ट

पुरुष 65 किलो - जयदीप देसवाल

महिला 50 किलो - सकिना खातून

स्विमिंग, शुक्रवार, 27 ऑगस्ट

200 वैयक्तिक मेडले SM7 - सुयश जाधव

शुक्रवार, 3 सप्टेंबर

50 मीटर बटरफ्लाय एस 7 - सुयश जाधव, निरंजन मुकुंदन

टेबल टेनिस, बुधवार, 25 ऑगस्ट

वैयक्तिक C3 - सोनलबेन मधुभाई पटेल

वैयक्तिक C4 - भावना हसमुखभाई पटेल

तायक्वांडो, गुरुवार, 2 सप्टेंबर

महिला K44 -49kg - अरुणा तंवर

शूटिंग, सोमवार, 30 ऑगस्ट

पुरुष आर 1 - 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग एसएच 1 - स्वरूप महावीर उन्हाळकर, दीपक सैनी

महिला R2 - 10 मीटर एअर रायफल SH1 - अवनी लेखारा

मंगळवार, 31 ऑगस्ट

पुरुष P1 - 10 मीटर एअर पिस्तूल SH1 - मनीष नरवाल, दीपेंद्र सिंग, सिंहराज

महिला P2 - 10 मीटर एअर पिस्तूल SH1 - रुबिना फ्रान्सिस

बुधवार, 1 सप्टेंबर

मिश्रित R3 - 10 मीटर एअर रायफल प्रोन SH1 - दीपक सैनी, सिद्धार्थ बाबू आणि अवनी लेखारा

गुरुवार, 2 सप्टेंबर

मिश्रित P3 - 25 मीटर पिस्तूल SH1 - आकाश आणि राहुल जाखार

शुक्रवार, 3 सप्टेंबर

पुरुष R7 - 50 मीटर रायफल 3 पोझिशन SH1 - दीपक सैनी

महिला R8 - 50 मीटर रायफल 3 पोझिशन SH1 - अवनी लेखारा

शनिवार, 4 सप्टेंबर

मिश्रित P4 - 50 मीटर पिस्तूल SH1 - आकाश, मनीष नरवाल आणि सिंगराज

रविवार, 5 सप्टेंबर

मिश्रित R6 - 50 मीटर रायफल प्रोन SH1 - दीपक सैनी, अवनी लेखारा आणि सिद्धार्थ बाबू

अॅथलेटिक्स, शनिवार, 28 ऑगस्ट

पुरुष भाला फेक F57 - रणजीत भाटी

रविवार, 29 ऑगस्ट

पुरुष डिस्कस थ्रो F52 - विनोद कुमार

पुरुष उच्च उडी T47 - निषाद कुमार, राम पाल

सोमवार, 30 ऑगस्ट

पुरुष डिस्कस थ्रो F56 - योगेश कठुनिया

पुरुष भाला फेक F46 - सुंदरसिंग गुर्जर, अजीत सिंग, देवेंद्र झाझरिया

पुरुष भाला फेक F64 - सुमित अंतिल, संदीप चौधरी

मंगळवार, 31 ऑगस्ट

पुरुष हाय-जंप टी 63 - शरद कुमार, मरीअप्पन थंगावेलू, वरुण सिंह भाटी

महिला 100 मी टी 13 - सिमरन

महिला शॉट पुट एफ 34 - भाग्यश्री माधवराव जाधव

बुधवार, 1 सप्टेंबर

पुरुष क्लब थ्रो F51 - धरमबीर नैन, अमित कुमार सरोहा

गुरुवार, 2 सप्टेंबर

पुरुष शॉट पुट F35 - अरविंद मलिक

शुक्रवार, 3 सप्टेंबर

पुरुष उच्च उडी T64 - प्रवीण कुमार

पुरुष भाला फेक F54 - टेक चंद

पुरुष शॉट पुट F57 - सोमण राणा

महिला क्लब थ्रो एफ 51 - एकता ध्यान, कशिश लाकरा

शनिवार, 4 सप्टेंबर

पुरुष भालाफेक F41 - नवदीप सिंह