Tokyo Olympics 2020: इस्रायली Swimmers ने माधुरी दीक्षितच्या ‘आजा नच ले’ गाण्यावर सादर केला डांस, सोशल मीडियात 'पाणीदार' व्हिडिओ व्हायरल (Watch Video)
इस्रायली जलतरणपटू (Photo Credit: Twitter)

Tokyo Olympics 2020: जपानची राजधानी टोकियो येथे ऑलिम्पिक (Tokyo Olympics) 2020 खेळ सुरु आहेत आणि अनेक देशांतील विविध खेळाडू यात सहभाग घेत आहेत. नुकत्याच झालेल्या ऑलिम्पिक दरम्यान, इस्रायली (Israel) जलतरणपटूंनी लोकांचे लक्ष वेधून घेतले आणि चर्चेचा विषय बनले आहेत. इस्त्रायली जलतरणपटू इडन ब्लेचर (Eden Blecher) आणि शेली बोब्रिटस्की (Shelly Bobritsky) यांनी मंगळवारी बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या (Madhuri Dixit) 'आजा नाचले' या गाण्यावर (Aaja Nachle Song) पाण्यात डांस करत स्विमिंग केली. या दोघांचा हा पाणीदार व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. इस्त्रायली जलतरणपटूंचा हा व्हिडिओ दर्शवतो की देशाबाहेरही बॉलीवूडने (Bollywood) अनेक देशांमध्ये आपले स्थान बनवले आहे. एका सोशल मीडिया यूजरने इस्रायली जलतरणपटूंचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

परदेशी नागरिकांमध्येही हिंदी चित्रपट आणि त्यातील गाण्यांची आवड या व्हिडिओने स्पष्ट दिसुन येते. Anne Danam नावाच्या ट्विटर यूजरने इस्रायली पोहणाऱ्यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिने  असेही लिहिले की, ‘टीम इस्राईलचे यासाठी खूप खूप आभार! ते ऐकून आणि पाहून मी किती उत्साहित झालो होतो याची तुम्हाला कल्पना नाही! आजा नचले!’ दरम्यान टोकियो एक्वाटिक्स सेंटरमध्ये महिला दुहेरीच्या अंतिम फेरीसाठी पात्र होण्यासाठी इस्रायली जोडी इडन ब्लेचर आणि शेली बोब्रिटस्की यांना संघर्ष करावा लागत होते. मात्र, ते या स्पर्धेत पात्र ठरले नाही. त्याचबरोबर ऑलिम्पिकमध्ये बॉलिवूडची थोडी भर घातल्याबद्दल भारतीय चाहते इस्रायली जोडीचे कौतुक करत आहेत.

दरम्यान, ऑलिम्पिकमधील कलात्मक जलतरण कार्यक्रमाची विनामूल्य दिनचर्या आहे आणि ती 3-4 मिनिटे चालते. तांत्रिक दिनचर्यामध्ये पाच निर्दिष्ट क्रियाकलाप असतात आणि जास्तीत जास्त 2.50 मिनिटे असतात. ऑलिम्पिकच्या अधिकृत वेबसाइटनुसार सहभागींना सिंक्रोनाइझेशन, अडचण, तंत्र आणि नृत्यदिग्दर्शनाच्या आधारे गुण दिले जातात.