Tokyo Olympics 2020 India Schedule: भारताने टोकियो ऑलिम्पिक (India Tokyo Olympics_ 2020 मोहिमेची जबरदस्त सुरुवात केली होती. मीराबाई चानूने (Mirabai Chanu) वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक जिंकले होते, परंतु त्यानंतर या स्पर्धेत देशातील खेळाडूंकडून संमिश्र कामगिरी पाहायला मिळाली. देशासाठी पदक जिंकण्याचे आश्वासन देणारे अनेक खेळाडू भव्य रंगमंचावर कामगिरी करू शकले नाहीत परंतु कित्येक नवोदित खेळाडू उदयास आले आणि त्यांनी व्यासपीठावर येण्याची शक्यता व्यक्त केली. भारताच्या दुसर्या पदकाच्या शोध मोहिमेला गुरुवारी पुन्हा सुरुवात होईल. सहाव्या दिवशी देशवासियांना मनु भाकर (Manu Bhaker), राही सरनोबत आणि शटलर पीव्ही सिंधू यांच्याकडून पदकाची आशा असेल. भारतीय वेळेनुसार गुरुवारी टोकियो ऑलिम्पिकमधील भारताचे वेळापत्रक जाणून घेऊया.
टोकियो ऑलिम्पिकच्या सहाव्या दिवशी आर्चर अतानू दास, बॉक्सर मेरी कोम आणि शटलर पीव्ही. सिंधू आपल्या खेळात पदक मिळवण्याच्या दिशेने आगेकूच करतील. दरम्यान, अर्जेंटिनाचा सामना करत भारतीय पुरुष हॉकी संघ पुढील फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी संघर्ष करताना दिसेल. दुसरीकडे, महिलांच्या 25 मीटर पिस्तूल इव्हेंटमध्ये भारतीय नेमबाज राही सरनोबत फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी झुंज देईल.
Set your alarms ⏰#TeamIndia has an action packed day tomorrow.
Take a look at @Tokyo2020 events scheduled for 29 July. Catch your favourite athletes in action on @ddsportschannel and send in your #Cheer4India messages below. pic.twitter.com/EnhmOUUJVs
— SAIMedia (@Media_SAI) July 28, 2021
पहाटे 5:20 रोव्हिंग: पुरुष दुहेरी स्कल्स फायनल बी: अर्जुनलाल जाट आणि अरविंद सिंग
पहाटे 5:22 गोल्फः पुरुषांची फेरी 1: अनिर्बन लाहिरी
पहाटे 5:30: महिला 25 मीटर पिस्तुल पात्रता: राही सरनोबत आणि मनु भाकर शूटिंग करत आहे
पहाटे 6:00 हॉकी: मेन्स इंडिया वि अर्जेंटिना पूल ए
पहाटे 6:15 बॅडमिंटन: महिला एकेरी फेरी 16: पीव्ही सिंधू
पहाटे 7:31 तिरंदाजी: पुरुष वैयक्तिक 1/32 एलिमिनेशन: अतानू दास
पहाटे 7:39: गोल्फ: पुरुष फेरी 1: उदयन माने
सकाळी 8:35: सेलिंग, मेनस लेझर रेस 7 आणि 8: विष्णू सरवनन
सेलिंग 49er पुरूष तेस 5 आणि 6: केजी गणपती आणि वरुण ठक्कर
सकाळी 8: 45 सेलिंग, महिला लेझर रेडियल रेस 7 आणि 8: नेथ्रा कुमानन
सकाळी 8:48: बॉक्सिंग, राऊंड ऑफ 16 पुरुष 91 किलोग्राम: सतीश कुमार
दुपारी 3:36: बॉक्सिंग, राउंड ऑफ 16, महिला 51 किलो: एमसी मार्ट कॉम
दुपारी4:16: जलतरण, पुरुष 100 मीटर फुलपाखरू- हिट 2 साजन प्रकाश