Tokyo Olympics 2020: दीपिका कुमारी - प्रवीण जाधवची मिश्रा जोडी उपांत्यपूर्व फेरीत, चिनी तैपेईला केले पराभूत
दीपिका कुमारी (Photo Credit: Twitter/worldarchery)

Tokyo Olympics 2020: दीपिका कुमारी (Deepika Kumar) आणि प्रवीण जाधव (Praveen Jadhan) यांच्या भारतीय तिरंदाजी (India Archers) मिश्र जोडीने चिनी ताइपेच्या लिन चिया-एन आणि तांग चिह-चुन या जोडीचा पराभव करून टोकियो ऑलिम्पिकची (Olympics) उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. भारतीय जोडीने सामन्यात 3-1 ने मागे राहिल्यावर प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला आणि उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाला (South Korea) झुंज देण्याची संधी निर्माण केली. टायब्रेकर जिंकण्यासाठी भारतीय जोडीला परफेक्ट 10 ची गरज होती आणि भारतीय जोडीने निराश न करता 10 गुण मिळवले. प्रवीण जाधवने पुरुषांच्या पात्रता स्पर्धेत, अतानू दास (Atanu Das) आणि तरुणदीप रायच्या पुढे, जास्त गुण मिळवत महिला वर्ल्ड नंबर 1 तिरंदाज दीपिका सोबत जोडी बनवण्याचा मान मिळवला. (Tokyo Olympics 2020: पुरुष हॉकी संघाची विजयी सलामी, न्यूझीलंडवर 3-2 ने केली मात)

ऑलिंपिकमधील मिश्र टीम इव्हेंटमध्ये भाग घेणारी भारताची दीपिका कुमारी आणि प्रवीण जाधव ही पहिली तिरंदाज होती. ऑलिम्पिक खेळात पहिल्यांदा तिरंदाजी खेळाचा समावेश करण्यात आणि भारतीय जोडीने  विजय मिळवला. इतकंच नाही तर दीपिका कुमारी आणि प्रवीण जाधवची जोडी देखील पहिल्यांदा मैदानात उतरली होती. चिनी तैपेईने पहिल्या सेटमध्ये भारतावर 36-35 असा विजय नोंदविला. या दरम्यान प्रवीण कुमार काही घाईत दिसला. तर दीपिका कुमारीने चांगली कामगिरी करत भारतावर दबाव येऊ दिला नाही. ज्यानंतर सामन्यात मागे पडल्यानंतर भारताला विजय नोंदवण्यात यश आले.

दुसरीकडे, नेमबाजीत अपूर्वी चंदेला आणि इलव्हनिल वलारीवान महिलांच्या 10 मीटर एअर रायफल पात्रता फेरीतून बाहेर पडले व त्यांना पदक फेरी गाठता आली नाही. तसेच पुरुष हॉकी संघाने आपल्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडवर 3-2 ने मात केली आणि स्पर्धेची विजयी सुरुवात केली.