Tokyo Olympics 2020: Avinash Sable याने मोडला स्वतःचा राष्ट्रीय विक्रम, पण ऑलिम्पिक स्टीपलचेस फायनलला मुकला
अविनाश साबळे (Photo Credit: Twitter)

Tokyo Olympics 2020: टोकियो ऑलिम्पिकच्या 3000 मीटर स्टीपलचेस (Steeplechase) स्पर्धेत भारताच्या अविनाश साबळेने (Avinash Sable) स्वत:चा राष्ट्रीय विक्रम मोडला, परंतु दुसर्‍या हिट रेसच्या पहिल्या तीन खेळाडूंपेक्षा चांगला वेळ नोंदवूनही तो अंतिम फेरी गाठण्यात अपयशी ठरला. 26-वर्षीय अ‍ॅथलीट 8:18:12 अशा टायमिंगसह सातव्या स्थानावर राहिला आणि आपली वैयक्तिक सर्वोत्तम 8:20:20 वेळ सुधारली, ज्याची त्याने यंदा वर्षीच्या सुरुवातीला पटियाला फेडरेशन कपमध्ये नोंदवली होती. तथापि, लष्करचा खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरण्याची शक्यता कमी आहे कारण तो आशादायक सुरवातीनंतर अंतिम रेषेजवळ पोचताना पिछाडीवर पडला. प्रत्येक हिटमधील अव्वल तीन आणि सर्व हिटमधून पहिले सहा अंतिम फेरीत प्रवेश करतात. साबळे दुर्दैवी ठरला कारण तिसऱ्या हिटमधील पहिले तीन खेळाडू त्याच्यापेक्षा हळू धावले होते. (Tokyo Olympics 2020: ऑलिम्पिक पदकाचं दिशेने दीपिका कुमारीचे एक पाऊल पुढे, तिरंदाजांच्या उपांत्यपूर्व फेरीत केला प्रवेश)

साबळे पात्रता हिटमध्ये सातव्या आणि एकूण 13 व्या स्थानावर राहिला. अविनाश साबळे हे महाराष्ट्रातील बीड येथे राहणाऱ्या शेतकरी कुटुंबातून आले आहेत. साबळे पहिल्यांदाच ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेत असून तो गेल्या वर्षी प्रसिद्धीच्या झोतात आला जेव्हा दिल्ली हाफ मॅरेथॉनमध्ये त्याने राष्ट्रीय विक्रम मोडला. साबळेने ती शर्यत एक मिनिट 30 सेकंदात पूर्ण केली. साबळेपूर्वी कोणत्याही भारतीयने 61 मिनिटांपेक्षा कमी वेळात अर्ध मॅरेथॉन पूर्ण केली नव्हती. भुवनेश्वर येथील 2018 ओपन नॅशनल अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत 37 वर्ष जुना राष्ट्रीय विक्रम मोडणारा साबळे आपले रेकॉर्ड तोडण्यासाठी प्रसिद्ध आहेत. साबळे यांनी 1981 मध्ये टोकियो येथे झालेल्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 8: 30.88 अशी वेळ प्रस्थापित करणाऱ्या गोपाल सैनीचा दीर्घकालीन राष्ट्रीय विक्रम मोडला.

2019 मध्ये दोहा येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम शर्यतीत 13 व्या स्थानावर असताना नायब सुभेदार यांनी पुरुषांच्या 3,000 मीटर स्टीपलचेस स्पर्धेत टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवली. अधिकारीक दिलेल्या माहितीनुसार, 40 वर्षांहून अधिक काळात जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारा ते पहिला भारतीय पुरुष स्टीपलचेसर होते.