महाराष्ट्र केसरी 2023-24 च्या फायनलमध्ये वाशिमच्या सिकंदर शेख याने गतविजेता शिवराज राक्षेला वीस सेकंदाच्या चीत करत मैदान मारलं. बलदंड शरीर यष्टीच्या शिवराजला अवघ्या दहा सेकंदामध्ये त्याने अस्मान दाखवत 66 वा महाराष्ट्र केसरीचा मान मिळवला. मागील वर्षी हुकलेली संधी सिकंदरच्या डोक्यात होती. अवघ्या महाराष्ट्राने महेंद्र गायकवाड याच्याकडून झालेला पराभव पाहिला होता. पण गडी खचला नाही आपला सराव सुरू ठेवला आणि यंदा मागील वर्षीचा विजेता शिवराज राक्षे याला पराभूत करुन विजय मिळवला. (हे देखील वाचा: Rohit Sharma Sixes Record: रोहित शर्मा ख्रिस गेलचा विक्रम मोडणार, मारावे लागलणार एवढे षटकार)
Congratulations Sikander Shaikh for winning the 66th State Championship of Maharashtra Kesari.A solid win under 23 seconds @SakalMediaNews #wrestling #sikandershaikh #MaharashtraKesari pic.twitter.com/F3ko7T2nJ4
— Fitindia (@fitindia1) November 10, 2023
The Maharashtra State Championship Wrestling Tournament is witnessing an intense battle for the prestigious Maharashtra Kesari title, with Sikandar Sheikh and Shivraj Rakshe set to face off in the final. Sikandar secured victory in the soil category, while Shivraj reached the… pic.twitter.com/uCH78ztXQv
— Pune Mirror (@ThePuneMirror) November 10, 2023
सिंकदरने गतविजेता शिवराज राक्षे याला अवघ्या दहा सेकंदात चीत केले. त्याने शिवराज याच्याविरोधात अवघ्या 5 सेकंदात झोळी डाव टाकून सामन्याचा निकाल लावला आणि 66वा महाराष्ट्र केसरी बनण्याचा मान मिळवला. यंदाची महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुणे जिल्ह्यातील लोणीकंद - फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस स्कूलच्या मैदानावर पार पडली.
यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या उपांत्या फेरीत गादी विभागात शिवराज राक्षेने हर्षद कोकाटेचा पराभव करून फायनल गाठली. त्याचे लक्ष्य दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी बनण्यावर होते. पण सिकंदरने ते स्वप्न पूर्ण होऊ दिले नाही. तर माती विभागात सिकंदर शेखने संदीप मोटेवर 10-0 असा एकतर्फी विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला होता.
सिकंदर शेख याचा मागच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पराभव झाला होता. पण यंदा मात्र त्याने संधी गमावली नाही. शिवराज राक्षे याने मागील वर्षी महेंद्र गायकवाड याचा पराभव करत पहिल्यांदा महाराष्ट्र केसरीची गदा जिंकली होती. त्याचे सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होण्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही.