D Gukesh (Photo: @FIDE_chess)

Tata Steel Masters 2025: विश्वविजेता डी गुकेशने (D Gukesh)नेदरलँड्सच्या जॉर्डन व्हॅन फॉरेस्टशी बरोबरी साधली तर ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदाने (R Praaggnandhaa )सर्बियाच्या अलेक्सी सेराना याला पराभूत केले. टाटा स्टील मास्टर्सच्या 12 व्या फेरीनंतरही दोन्ही भारतीय खेळाडू अव्वल स्थानावर आहेत. प्रज्ञानंदाने सलग तिसरा विजय नोंदवत त्याचे गुण 12 पैकी 8.5 पर्यंत पोहोचवले. सध्या तो आणि गुकेश बरोबरीत आहे.

दोन्ही भारतीय खेळाडू आता या प्रतिष्ठित स्पर्धेत रोमांचक अंतिम फेरीसाठी सज्ज आहेत. जर दोघांपैकी कोणीही विजेतेपद जिंकले, तर टाटा स्टील मास्टर्सचे विजेतेपद एका भारतीय खेळाडूने जिंकणे ही पहिलीच वेळ असेल. कराव्या फेरीनंतर अव्वल स्थानावर लक्ष केंद्रित करणारा उझबेकिस्तानचा नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्ह अर्जुन एरिगेसीकडून पराभूत झाला आणि 7.5 गुणांसह जेतेपदाच्या शर्यतीतून जवळजवळ बाहेर पडला आहे. 12 व्या फेरीत खेळताना प्रज्ञानंदाने सेरानावर विजय मिळवला.

फॉरेस्टविरुद्ध गुकेशच्या कामगिरीत बरेच चढ-उतार पहायला मिळाले. ३९ व्या चालीनंतर गुकेशचा डाव चूकला त्यामुळे फॉरेस्टने खेळात पुनरागमन केले. ज्यामुळे गेम जिंकण्यात गुकेश अयशस्वी झाला. अंतिम फेरी रोमांचक ठरू शकते कारण गुकेशचा सामना एरिगेसीशी होईल तर प्रज्ञानंदाचा सामना कीमरशी होईल. दोन्ही बोर्डांवर सामना बरोबरीत सुटल्यास, कमी कालावधीचा प्ले-ऑफ विजेता ठरवेल.