लॉकडाऊन (Lockdown) काळात घरात बसून काय करायचे असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यामुळे कोण खिडकीत उभार राहून दूरवर पाहात आहे. कुणी उगाचच घरांच्या भिंती मोजत आहे. तर, काही लोक मिक्स फरसान वेगळे करुन खात आहेत. तर काही महिला, युवती एकमेकांना साडी चँलेंज देत आहेत. विशेष म्हणजे सोशल मीडियावर साडी चॅलेंज भलतेच लोकप्रिय झाले आहे. लोकप्रिय स्काय ड्राइव्हर (Skydiver) आणि पॅराजंपर शितल महाजन (Shital Mahajan) यांनी सोशल मीडियावर या चॅलेंजबाबत काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये दिसते की, शितल महाजन या आकाशामध्ये जमीनीपासून हजारो फूट उंचीवर साडी नेसून झेपावताना दिसत आहेत. साडी नेसून आकाशामध्ये झेपावलेल्या स्थितीमध्ये शितल महाजन यांनी आपले सेल्फीही काढल्या आहेत. हे सेल्फी फोटो त्यांनी आपल्या मित्र, मैत्रिणी आणि चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत.
सोशल मीडियावर शेअर केलेले आपले फोटो शितल महाजन यांना टॅग करत त्यांच्या अनेक मैत्रिणींनी त्यांना साडी चॅलेंज दिले होते. मग महाजन यांनीही त्यांचे चॅलेंज स्वीकारत आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले. हे सर्व फोटो इजिप्त मधील असावेत असे दिसते. कारण खाली जमीनीवर मोठमोठे पिरॅमीड दिसत आहेत.
साडी घालून आकाशात झेपावणाऱ्या शितल महाजन या बहुदा पहिल्याच स्काई ड्राईव्हर आणि पॅराजंपर असाव्यात. त्यांच्या या धाडसाबद्दल त्यांचे जोरदार कौतुक होत आहे. (हेही वाचा, Coronavirus Lockdown मुळे फेसबुक वर क्रिएटिव्हिटी ला उधाण, मित्रांच्या जुन्या फोटोवर केलेल्या 'या' कमेंट वाचताना हसून व्हाल हैराण!)
शितल महाजन या मुळच्या महाराष्ट्राच्या आहेत. पुणे जिल्ह्यात त्यांचे गाव आहे. सद्या त्या फिनलंड येथील Helsinki येथे राहतात. त्यांना दोन जुळी मुलं आहेत. शितल यांनी थायलंड येथे 13 हजार फूट उंचीवरुन झेप घेऊन विक्रम स्थापन केला होता. ही प्रदीर्घ झेप त्यांनी साडी नेसून घेतली होती. ही त्यांची झेप 8.25 मीटरची होती. अशा प्रकारची कामगिरी करणाऱ्या त्या पहिल्याच भारतीय महिला आहेत.
शितल महाजन फेसबुक पोस्ट
शितल महाजन यांनी 2018 मध्ये 13 हजार फुट उंचीवरुन झेप घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. शितल महाजन यांच्या नावावर 5 विश्वविक्रम आणि 16 राष्ट्रीय पुरस्कार नोंदले गेले आहेत.