Facebook Funny Comments in Marathi: कोरोना व्हायरस (Coronavirus) च्या संकटाला रोखण्यासाठी मागील 7 दिवसांपासून लॉक डाऊन (Lockdown) सुरु आहे. साहजिकच घरबसल्या रोज नवीन काय करायचे या प्रश्नाने सर्वांना हैराण केले आहे. कंटाळा आल्याने तरुण मंडळींनी आपला मोर्चा आता फेसबुक (Facebook) कडे वळवला आहे. या मध्ये आपल्या फेसबुक फ्रेंड्स च्या जुन्या जुन्या फोटोना शोधून त्यावर कमेंट्स करण्याचा सुद्धा एक ट्रेंड सुरु झाला आहे. या कमेंट्स सुद्धा काही सध्या सुध्या नसून अगदी मजेशीर यमक जुळवून तयार केलेल्या आहेत. मुलांच्या फोटोवर भाऊ आणि मुलीच्या फोटोवर ताई जोडून या कमेंट्स केल्या जात आहेत. अशाच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ट्रेंड मधील निवडक गमतीच्या कमेंट्स आज आपण पाहणार आहोत. वाट कसली पाहायची चला तर मग... Coronavirus Lockdown च्या काळात गोवा पोलिसांकडून नागरिकांना घाबरवून घरी बसवण्यासाठी 'भूता'चा वापर? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओ मागील सत्यता
Facebook Funny Comments in Marathi
मुलांच्या फोटोवर केल्या जाणाऱ्या कमेंट्स
- रात्रीच्या वेळी आकाशात दिसतो मुन..
हा फोटो बघुन पोरी करायला लागले एकमेकांचा खुन.
- शॉप आहेत बंद मिळतोय फक्त किराणा,
भाऊंचा फोटो म्हणजे पोरींसाठी नजराणा
- भाऊ ची पाहली अशी अदा
त्यावर राणू मंडल फिदा
- फळा पुसायला भाऊंनी घेतलाय डस्टर
पोरी म्हणतात मलाच बनवा तुमची होम मिनिस्टर
- चावला मच्छर आली खाज....
भाउ के खूबसुरती का क्या है राज.
- भाउंची अदा इतकी मस्त
की पोरी झाल्या कोरोनाग्रस्त
- पेरु आणला घरी, पण नव्हता आमच्याकडे चाकू….
सगळ्या मुली बोलतात, हाच आमच्या दिलाचा डाकू
मुलींच्या फोटोवर केल्या जाणाऱ्या कमेंट्स
- मटकी ला मोड नाही, ताई ला तोड नाही
- दोन दगडांना भेदून टाकेल अशी तीक्ष्ण ताईंची जॉ लाईन…
सगळे पोरं म्हणतात “शी इज ओन्ली माईन
- ठेवला होता गुळ, ग़ुळावर बसली माशी.
ताईने रिप्लाय नाही दिला तर, पोरं घेतात फाशी
- अगरबत्ती जाळली की होतो धूर
ताईंनी फोटो टाकला की पोरांच्या दिलाचा होतो चक्काचूर
- फास्ट गाडी चालवुन
मागे टाक सशाला
एवढ्या सुंदर चेहर्याला
फेअर अँड लव्हली कशाला
- गोठ्यात गाई, घरात आई, शिर्डीत साई,
आणि FB वर फक्त आपल्या ताई!!
आता हा क्रिएटिव्ह टाईमपास बघून तुम्हालाही तुमच्या मित्रांच्या फोटोवर कमेंट करायची इच्छा झाली असेल तर बिनधास्त यापैकी कोणतीही कमेंट करू शकता. किंवा जर का तुम्हाला तुमच्या काही नव्या कमेंट्स सुचत असतील तर त्या आमच्यासोबत सुद्धा शेअर करा.