
बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन (BWF) च्या संस्मरणीय हंगामानंतर सात्विकसाईराज रंकीरेड्डी (Satwiksairaj Rankireddy) आणि चिराग शेट्टी (Chirag Shetty) यांच्या दुहेरीच्या जोडीला ‘मोस्ट इम्प्रुव्हर्ड प्लेअर ऑफ दी इयर’ पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहेत. यावर्षी फ्रेंच ओपन सुपर 750 स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यापूर्वी थायलंड ओपन स्पर्धेत युवा जोडीने सुपर 500 विजेतेपदाचा मान मिळवला होता. शिवाय, यावर्षी 11 सुवर्ण, तीन रौप्य आणि चार कांस्यपदकं जिंकणाऱ्या भारताचा पॅरा बॅडमिंटनपटू प्रमोद भगत याला 'पुरुष पॅरा बॅडमिंटन प्लेअर ऑफ द इयर' पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले आहे. ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पीव्ही सिंधू हिला मात्र 'महिला प्लेअर ऑफ द इयर' साठी नामांकनमध्ये स्थान मिळवता आले नाही. यंदा सिंधूने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण वगळता कोणतेही पदक जिंकले नाही. बीडब्ल्यूएफच्या या प्रतिष्ठित पुरस्कारांद्वारे एलिट बॅडमिंटनपटू आणि सहा गटांमधील खेळाडूंच्या कामगिरीची नोंद केली जाते.
इतर गटात कॅनडाची महिला एकेरी खेळाडू मिशेल ली, किम सो येओंग आणि कोंग ही योंग या कोरियन महिला दुहेरी आणि प्रवीण जॉर्डन आणि इंडोनेशियाचे प्रवीण जॉर्डन आणि मेलाती डेवा ओक्टाव्हियन्ती यांचे मिश्र दुहेरी विभागात नामांकन देण्यात आले आहे. बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूरवर तीन विजेतेपद मिळविणारी चिनी तैपेईची जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकाची ताई झिंग यिंग हिला 'महिला प्लेअर ऑफ द इयर'साठी नामांकन देण्यात आले आहे.
'पुरुष प्लेअर ऑफ द इयर' पुरस्कारांमध्ये दोन वेळा विश्वविजेतेपद आणि जपानच्या जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकाचा केंटो मोमोटा, ज्याने यावर्षी 10 पदकं जिंकली आहे, याला इंडोनेशियन पुरुषांच्या दुहेरीत मार्कस फर्नाल्डी गिदोन आणि केविन संजया सुकामुल्जो या जोडीसह नामांकन मिळाले आहे. 11 ते 15 डिसेंबरदरम्यान होणाऱ्या बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्सच्या दुसर्या आवृत्तीचे उद्घाटन समारंभ आणि गला डिनरदरम्यान वर्षाच्या सर्वोच्च बॅडमिंटनपटूंना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.