Roland Garros Final 2020: नोवाक जोकोविचविरुद्ध राफेल नडालने मारली बाजी, 13वे फ्रेंच ओपन विजेतेपद जिंकत केली रोजर फेडररच्या ग्रँड स्लॅम रेकॉर्डची बरोबरी
राफेल नडाल (Photo Credit: PTI)

Roland Garros Final 2020: 'किंग ऑफ क्ले' राफेल नडालने (Rafael Nadal) जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानाचा नोवाक जोकोविचचा (Novak Djokovic) रोलँड गॅरोसच्या (Roland Garros) पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात  सरळ सेटमध्ये 6-0, 6-2, 7-5 असा एकतर्फी पराभव करून 13वे फ्रेंच ओपन विजेतेपद जिंकले. नडाल क्ले कोर्टचा सर्वात यशस्वी टेनिसपटू म्हणून ओळखला जातो. या विजयासह नदालने रोजर फेडररच्या (Roger Federer) विक्रमी 20 ग्रँड स्लॅम जेतेपदांची बरोबरी केली आणि पुरुष टेनिसमध्ये सर्वाधिक ग्रँड स्लॅम (Most Grand Slam Titles) जिंकणाऱ्यांमध्ये अव्वल स्थान पटकावले. इतकंच नई तर रोलँड गॅरोस स्पर्धेतील नडालचा हा 100वा विजय होता. 18 व्या ग्रँड स्लॅम जेतेपदासाठी मैदानात उतरल्याने जोकोविच नडाल नावाचा अडथळा पार करू शकला नाही. दोन्ही खेळाडूंमधील सामना 2 तास 41 मिनिटे चालला. यावर्षी जोकोविचला ग्रँड स्लॅममधील पहिला पराभव ठरला. यापूर्वी त्याला अमेरिकन ओपनमधून लाईन अंपायरला चेंडू मारल्याने बाहेर केले गेले होते. (Roland Garros 2020 Final: 19 वर्षीय Iga Swiatek बनली फ्रेंच ओपनची राणी, फायनल लढाईत सोफिया केनिनचा पराभव करत जिंकले पहिले ग्रँड स्लॅम)

मोठी गोष्ट म्हणजे नडालने 13व्या वेळी फ्रेंच ओपनच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आणि 13व्या वेळी जेतेपद जिंकले. नडालने 13 वेळा फ्रेंच ओपन, यूएस ओपनने 4 वेळा, विम्बल्डनने 2 वेळा आणि ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये एकदा असे मिळून 20 ग्रँड स्लॅम जेतेपद जिंकले आहेत. चारही ग्रँड स्लॅम जेतेपद जिंकलेल्या जगातील निवडक खेळाडूंच्या क्लबमध्ये नडालचा समावेश आहे. फेडररने आपल्या कारकीर्दीत 20 ग्रँड स्लॅम जेतेपद जिंकले असून त्यात 8 विम्बल्डन, 6 ऑस्ट्रेलियन ओपन, 5 यूएस ओपन आणि 1 फ्रेंच ओपनचा समावेश आहे. फेडररने 2009 मध्ये फ्रेंच ओपनचे जेतेपद जिंकले होते.

दुसरीकडे यापूर्वी, महिला एकेरीत पोलंडच्या 19 वर्षीय खेळाडू इगा स्विएटेकने फ्रेंच ओपनच्या महिला टेनिसच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन सोफिया केनिनचा पराभव करून इतिहास रचला. स्विएटेकने सोफिया केनिनला सलग दोन सेटमध्ये 6-4, 6-1ने पराभूत केले आणि फ्रेंच ओपन महिला एकेरीचे जेतेपद जिंकले. स्विएटेकने अंतिम सामन्यात चौथ्या मानांकित केनिनचा सलग सेटमध्ये अवघ्या एका तासामध्ये 24 मिनिटांत पराभव केला. स्विएटेक रोलँड गॅरोसच्या महिला अंतिम फेरीत प्रवेश करणारी सर्वात कमी क्रमांकाची खेळाडू ठरली.