स्पेनचा टेनिसपटू आणि क्ले कोर्टाचा राजा राफेल नदाल (Rafael Nadal) शनिवारी आपल्या बालपणातील मित्र सिस्का प्रेलो (Xisca Perelló) शी विवाहबंधनात अडकणार आहे. ‘द सन’ च्या अहवालानुसार नदाल आणि सिस्का माजोरकाच्या 'ला फोर्टालिझामध्ये लग्न करणार आहेत. ही तीच जागा आहे जिथे या वर्षाच्या सुरुवातीस रियल माद्रिदचा दिग्गज फुटबॉलर गॅरेथ बेल या विवाह झाला होता. सिसकाचे पूर्ण नाव मारिया फ्रान्सिस्का पेरेलो आहे. नदालच्या लग्नात 350 लोक उपस्थित राहणार आहेत. मागील चार दशकांपासून स्पेनचा राजा असलेले जुआन कार्लोस (Juan Carlos) प्रथम यांना या लग्नासाठी आमंत्रण पाठवण्यात आले आहे. टेनिसमधून निवृत्त झालेला कार्लोस मोया याचेदेखील पाहुण्यांच्या यादीत समावेश केला आहे. मोया सध्या नदालचा प्रशिक्षक आहे.
टोम्यू कटला या जोडप्याच्या लग्नात पाद्रीची भूमिका साकारणार आहे. तो म्हणाला, 'मी आतापर्यंत केलेली सर्व विवाहसोहळे विशेष होती आणि हेदेखील असेच आहे. मी फक्त या दोघांचे लग्न करावणार आहे." या दोन्ही जोडप्याच्या लग्नाविषयी सर्वात महत्वाचं म्हणजे स्वित्झर्लंडचा अव्वल टेनिपटु रॉजर फेडरर (Roger Federer) नदालच्या लग्नात पोहचू शकणार नाही. बॅसलमधील स्विस इंडोर स्पर्धेच्या तयारी करत असल्याने फेडरर नदालच्या लग्नात सहभागी होऊ शकणार नाही.
नदाल आणि सिसका 14 वर्षांपासून प्रेमसंबंधात होते. सिसकाने आपली नोकरी सोडली आणि राफेल नदाल संस्थेच्या प्रकल्प संचालक म्हणून काम करण्यास सुरवात केली. नदालने या चॅरिटेबल ट्रस्टला 10 वर्षांपूर्वी सुरुवात केली होती. नदाल आणि सिस्का त्याच्या प्रेमसंबंधांबाबत खाजगी राहिले आहेत. सिस्काने हल्लीच नदालच्या टेनिस मॅचमध्ये सहभाग घेणे सुरु केले आहेत.