PC-X

R Praggnanandhaa Wins Tata Steel Masters 2025: टाटा स्टील मास्टर्स 2025मध्ये (Tata Steel Masters 2025) रविवारी 2 फेब्रुवारी रोजी नेदरलँड्समधील विज्क आन झी येथे झालेल्या रोमांचक टायब्रेकमध्ये ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदाने विश्वविजेता डी गुकेशचा (D Gukesh) पराभव केला. 2006 मध्ये विश्वनाथन आनंद यांच्यानंतर टाटा स्टील मास्टर्समध्ये सर्वोच्च पारितोषिक जिंकणारा प्रज्ञानंद (R Praggnanandhaa) हा पहिला भारतीय ठरला.

14 खेळाडूंच्या राउंड-रॉबिन स्पर्धेत, 13 फेऱ्यांनंतर फायनलमध्ये गुकेश आणि प्रज्ञानंद हे दोघे बरोबरीत आले होते. रविवारी प्रज्ञा आणि गुकेश दोघांमध्ये स्पर्धा झाली. स्पर्धेच्या शेवटच्या फेरीपर्यंत अपराजित राहिलेल्या गुकेशने विश्वविजेत्या म्हणून पहिल्यांदाच सामना गमावला.(Tata Steel Masters 2025: डी गुकेश आणि नेदरलँड्सच्या जॉर्डन व्हॅन फॉरेस्ट यांच्यातील सामना ड्रॉ; आर प्रज्ञानंदकडून सर्बियाच्या अलेक्सीचा पराभव)

रविवारी झालेल्या सामन्यात गुकेशने दोन गेमच्या ब्लिट्झ टायब्रेकरमध्ये पहिला गेम जिंकला. गुकेशला पहिला ब्लिट्झ जिंकण्यासाठी दुसऱ्या ब्लिट्झ टायब्रेकरमध्ये फक्त बरोबरीची आवश्यकता होती. तथापि, प्रज्ञानंदाने पिछाडीवरून पुनरागमन करत दोन्ही ब्लिट्झ गेम जिंकले आणि गुकेशला पराभूत करून जेतेपद जिंकले.

विश्वविजेता झाल्यानंतर गुकेशने पहिलाच सामना गमावला. तर टाटा स्टील मास्टर्समध्ये प्रज्ञानंदाचा या आधी पराभव झाला होता. व्हिन्सेंट कीमरकडून त्याला पराभावाला सामोर जावं लागल. मात्र, अंतिम सामन्यात उत्तम कामगिरीच्या जोरावर त्याने टाटा स्टील मास्टर्स 2025 जिंकले.