PV Sindhu Wedding (फोटो सौजन्य - X/@gssjodhpur)

PV Sindhu Wedding: भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू (Badminton Icon PV Sindhu) विवाहबंधनात अडकली आहे. राजस्थानमधील उदयपूर (Udaipur) मध्ये तिचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला. व्यापारी वेंकट दत्ता साई (Venkata Datta Sai) यांच्यासोबत पीव्ही सिंधूने सात फेरे घेतले. पीव्ही सिंधू आणि वेंकट यांच्या लग्नाचा पहिला फोटोही समोर आला आहे. यामध्ये दोघांची जोडी खूपच सुंदर दिसत आहे. चाहते दोघांना लग्नासाठी शुभेच्छा देत आहेत.

सिंधू-वेंकटच्या लग्नाचा पहिला फोटो -

सिंधू आणि व्यंकट यांचा विवाह सोहळा अतिशय खाजगी ठेवण्यात आला आहे. सिंधूने अद्याप तिच्या लग्नाचे फोटो शेअर केलेले नाहीत. मात्र, या लग्नात सहभागी झालेले केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी दोघांच्या लग्नाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये शेखावत देखील दिसत आहेत. नवविवाहित जोडप्याचा लग्नाचा फोटो शेअर करत त्यांनी पीव्ही सिंधूला शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले आहे. (हेही वाचा -PV Sindhu Engagement: चेहऱ्यावर हसू.. हातात अंगठी! पीव्ही सिंधूने Venkata Datta Sai सोबत केला साखरपूडा; फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी)

केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी लावली सिंधूच्या लग्नाला उपस्थिती - 

लग्नासाठी सिंधूने नेसली गोल्डन क्रीम कलरची साडी -

सिंधूने गोल्डन क्रीम कलरची साडी नेसली होती. समोर आलेल्या फोटोत सिंधू आणि व्यंकट बसले आहेत. तर गजेंद्र सिंह त्यांना आशीर्वाद देत आहेत. जवळच अजून काही लोक दिसत आहेत. सिंधूने तिच्या लग्नासाठी गोल्डन क्रीम कलरची साडी निवडली होती. लग्नानंतर अनेक तास उलटूनही सिंधूने सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट केलेली नाही. चाहते त्याच्या पोस्टची आतुरतेने वाट पाहत आहेत. (हेही वाचा -PV Sindhu Wedding: पीव्ही सिंधू लवकरच अडकणार विवाह बंधनात, 22 डिसेंबरला होणार विवाह सोहळा)

24 डिसेंबरला होणार रिसेप्शन -

सिंधूला आशीर्वाद देण्यासाठी गजेंद्र सिंह शेखावत यांच्याशिवाय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देखील पोहोचले होते. सिंधू आणि आयटी व्यावसायिक व्यंकट दत्ता साई यांचा विवाह उदयपूरमधील लेक सिटीच्या मध्यभागी असलेल्या हॉटेल राफेल्समध्ये मोठ्या थाटामाटात पार पडला. लग्नाला फक्त जवळचे आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. आता हे जोडपे 24 डिसेंबर रोजी हैदराबादमध्ये एका भव्य रिसेप्शनचे आयोजन करणार आहे. ज्यामध्ये क्रीडा जगताशिवाय, चित्रपट आणि राजकीय जगतातील दिग्गज व्यक्ती उपस्थित राहण्याची शक्यता आहे.