पुणे: राष्ट्रीय पातळीवर खेळलेल्या जलतरणपटूची गळफास लावून आत्महत्या, पोलिसांकडून तपास सुरु
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

पुणे (Pune) येथील राष्ट्रीय पातळीवर (National Level)  खेळलेल्या एका जलतरणपटूने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मात्र आत्महत्या करण्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास केला जात आहे.

साहिल जोशी (21) असे या मृत जलतरणपटूचे नाव आहे. साहिल हा पुण्यातील कोथरुड येथे राहत होता. शुक्रवारी त्याने राहत्या घरी गळफास लावत आपले आयुष्य संपवले आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांना मृतदेहाच्या आजूबाजूला कोणताही सुसाईड नोट सापडली नाही आहे. मात्र साहिलने एवढे टोकाचे पाऊल कोणत्या कारणामुळे उचचले याबद्दल तपास केला जात आहे.

तसेच साहिल याचे वडिल त्याला फोन करत होते. परंतु त्याने वडिलांचा एकही फोन न उचचल्याने तातडीने त्याचे वडिल त्याच्या राहत्या घरी पोहचले. मात्र त्यावेळी साहिलेने गळफास लावून घेतल्याचे त्यांनी पाहिल्यास त्यांना धक्का बसला आहे. तर पोलिसांनी अपघाती मृत्यू झाल्याची नोंद केली आहे.

(विश्वचषक नेमबाजीत राही सरनोबतची सुवर्ण कामगिरी, टोकियो ऑलिम्पिक 2020 चे तिकीट पक्के)

पोलिसांकडून पुढील तपास सुरु असून साहिल याच्या स्विमिंग कोच यांना याबद्दल विचारले असता त्यांनासुद्धा काही माहिती नव्हते. तसेच साहिलने आतापर्यंत नऊ वेळा राष्ट्रीय पातळीवर स्विमिंगच्या स्पर्धेत भाग घेतला असून सात वेळा जिंकला असल्याचे कोच यांनी स्पष्ट केले आहे. साहिल हा बॅकस्ट्रोक स्विमर असल्याचे त्याच्या कोचने सांगितले. मात्र साहिलच्या या निर्णयामुळे सर्वजण हळहळ व्यक्त करत आहेत.