Telegu Titans vs U Mumba (Photo Credits: IANS)

सध्या गेल्या काही काळापासून प्रेक्षकांच्या पसंदीस पडलेला प्रो-कबड्डीच्या (Pro Kabaddi League) सातव्या सीझनला आजपासून सुरुवात होणार आहे. तर या सीझनसाठी प्रेक्षक उत्सुक झाले असून पहिला सामना हैरदराबाद (Hyderabad) मधील गाचीबावली इनडोइर स्टेडिअमवर (Gachibowli Indoor Stadium) रंगणार आहे. तसेच यू मुंबा (U-Mumba) आणि तेलगू टायटान्स (Telugu Titans) या संघामध्ये पहिल्या सामन्याची लढत प्रेक्षकांना आज पाहायला मिळणार आहे. सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

तर सातव्या सीझनमध्ये प्रेक्षकांना प्ले-फसह एकूण 72 सामन्यांमधील लढत पाहायला मिळणार आहे. तर 20 जुलै ते 19 ऑक्टोंबर पर्यंत प्रो-कबड्डीचा थरार रंगणार आहे. मात्र यंदा या खेळासंबंधित काही नियमांत बदल करण्यात आले असून डबल राउंड रॉबिन फॉरमॅटमध्ये सामने खेळवले जाणार आहेत. प्रेक्षकांना प्रो-कबड्डीचे सामने Hotstar किंवा Star Sports वर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.(Indonesia Open 2019: जपानी खेळाडू नोमोजी ओकूहारा हिच्यावर मात करत भारताची पी.व्ही. सिंधू इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन टुर्नामेंटच्या सेमीफायनलमध्ये)

तसेच यंदा 12 संघ सहभागी होणार असून प्रत्येक संघ प्रतिस्पर्धी संघासोबत दोन वेळा खेळताना दिसून येणार आहे. तर 2018 मध्ये प्रथमच बेंगळुरू बुल्स यांनी प्रो-कबड्डीच्या पुरस्कारावर आपले नाव कोरले होते. त्याचसोबत 'मोस्ट व्हॅल्युएबल' यासाठी पवनकुमार याला पुरस्काराने गौरवण्यात आले होते.