U Mumba (Photo Credits: Twitter / @U_Mumba)

प्रो कबड्डी लीग सीजन 7 (Pro Kabaddi League 7) चा 14 वा आणि 15 वा सामना आज, 28 जुलै रोजी पार पडले. हे दोन्ही सामने यू मुंबा (U Mumba) आणि बंगळुरू बुल्स (Bengaluru Bulls) व दबंग दिल्ली (Dabang Delhi) आणि हरियाणा स्टीलर्स (Haryana Steelers) यांच्या दरम्यान पार पडले. हे सामने मुंबईच्या सरदार वल्लभ भाई पटेल इंडोर स्टेडियममध्ये पार पडले. या दोन्ही सामन्यांमध्ये चारही संघांनी उत्तम कामगिरी केली. मात्र मुंबई आणि बंगळुरूच्या सामन्यावेळी दुसऱ्या हाफच्या शेवटच्या 10 मिनिटांमध्ये पवन सेहरवात ने कमाल कामगिरी दाखवली व बंगळुरू बुल्स ना 30-26 म्हणजेच 4 गुणांनी विजय मिळवून दिला. अशाप्रकारे मुंबईला स्वतःच्या मातीत हार पत्करावी लागली आहे.

दोन्ही संघांच्या तुलना केली तर, आता 3 सामन्यापैकी 2 सामने जिंकून मुंबई 2 ऱ्या क्रमांकावर आहे. तर बंगळुरू तीनपैकी दोन सामने जिंकून 7 व्या स्थानावर आहे. यू मुंबाकडील अभिषेक सिंहने आपल्या संघाला ऑलआऊट होण्यापासून वाचविले. दुसऱ्या बाजूला मोहित सेहरावतने बंगळुरू बुल्सला आपल्या संघाला मजबुती दिली. सामन्याच्या उत्तरार्धात यु मुंबाची खेळी शानदार होती, चौथ्याच मिनिटाला संपूर्ण बंगळुरू बुल्सला त्यांनी बाद केले. त्यानंतर हा खेळ उलटला आणि बंगळुरु बुल्सने या रोमांचक सामन्यात मुंबई संघाचा पराभव केला. (हेही वाचा: Patna Pirates संघाचा पहिला विजय; Telugu Titans संघावर 34-22 ने मात)

दुसरीकडे दबंग दिल्ली ने हरियाणा स्टीलर्सला हरवून, विजयाची हॅटट्रिक केली आहे. प्रो कबड्डीच्या 7 व्या सिझनमध्ये दिल्लीचा हा सलग तिसरा विजय आहे. या सामन्यात दबंग दिल्लीने हरियाणा स्टीलर्सचा 41-21 असा पराभव केला. या विजयासह दिल्ली 15 गुणांसह शीर्षस्थानी पोहोचली आहे.