Pro Kabaddi 2019: यु मुंबा कडून गुजरात फॉर्च्यून जायंट्स चा 31-25 ने पराभव, गुणतालिकेत चौथ्या स्थानी झेप
यु मुंबई आणि गुजरात गुजरात फॉर्च्यून जायंट्स (Photo Credit: @ProKabaddi/Twitter)

प्रो कबड्डी लीग (Pro Kabaddi League) 2019 च्या 102 व्या सामन्यात यु मुंबा (U Mumba) संघाने गुजरात फॉर्च्यून जायंट्स (Gujarat Fortunegiants) ला 30-25 ने पराभूत केले. या विजयासह यु-मुंबा 53 गुणांसह पॉईंट टेबलमध्ये चौथ्या स्थानी आला. तर गुजरातला आजच्या मॅचपासून एक गुण मिळाला आहे आणि यासह त्यांनी पटना पायरेट्सला मागे टाकत 9 वे स्थान पटकावले आहे. मुंबई संघाच्या या विजयाचा अर्थ आहे की तामिळ थॅलेवास अधिकृतपणे प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.

पहिल्या हाफची सुरुवात फार हळू झाली आणि 3 मिनिटांत केवळ 2 गुण झाले. गुजरात फॉर्च्युन जायंट्सने सुरुवातीला आघाडी मिळवली. यानंतर यु-मुंबाने पुनरागमन केले आणि 10 व्या मिनिटाला आघाडी मिळवली. 11 व्या मिनिटाला मुंबाने गुजरातला ऑल आऊट करत मागे टाकले आणि 5 गुणांची आघाडी घेतली. मात्र, त्यानंतर गुजरातने मुंबाला ऑलआऊट सामन्यात शानदार पुनरागमन केले. हाफ-टाइम पर्यंत स्कोअर 16-16 असा कायम राहिला. गुजरातकडून पहिल्या हाफमध्ये कर्णधार रोहित गुलियाने 9 गुण मिळवले, तर यु-मुंबासाठी अभिषेक सिंह याने 5 गुण आणि संदीप नरवाल याने 3 गुण मिळवले.

दुसऱ्या हाफमध्ये देखील दोन्ही संघात कडवी झुंज पाहायला मिळाली. 27 व्या मिनिटाला स्कोर 18-18 ने बरोबरीत होता. 30 व्या मिनिटापर्यंत कोणत्याही संघाकडे आघाडी नव्हती परंतु काही वेळाने यु-मुंबाने 3 गुणांची आघाडी घेतली. आणि 37 व्या मिनिटाला गुजरात संघाला ऑल आऊट करत आपला विजय निश्चित केला. अभिषेकसिंगने यू-मुम्बाकडून सुपर 10 घेलता, तर गुजरातकडून रोहितने 9 गुण मिळवले. दरम्यान, यु-मुंबाचा पुढील 27 सप्टेंबरला बेंगलुरू बुल्सविरुद्ध होईल. दुसरीकडे, गुजरात फॉर्च्यून जायंट्सची टीम आता आपला पुढील सामना 28 सप्टेंबरला तमिळ थालाइवासशी खेळणार आहे.