Pro Kabaddi 2019: Puneri Platan यांची 31 गुण मिळवत Bengaluru Bulls विरोधात विजयाची खेळी
Pro Kabaddi 2019 (Photo Credits- Twitter)

प्रो कबड्डी (Pro Kabaddi ) सीझन 7 मध्ये आज पुनेरी पलटन (Puneri Platan) विरुद्ध बंगळुरु बुल्स (Bengaluru Bulls) संघाचा सामना खेळवण्यात आला. जवाहरलाल नेहरु इंडोर स्टेडिअमर आजच्या सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. तर पुणेरी पलटन संघाने बंगळुरु बुल्स संघाला हरवत विजयाची खेळी आजच्या सामन्यात केली आहे.

पुणेरी पलटन संघामधील खेळाडून मनजित याने 7 रेड टाकत संघाला 7 गुण एकट्याने मिळवून दिले. तसेच सुरजित सिंग, शहाजी जाधव, अमित कुमार यांनी सुद्धा संघाला विजय मिळवून देण्यासाठी शानदार खेळी केली. त्याचसोबत संघातील खेळाडूंनी एकूण 31 गुण मिळवत आजचा सामना जिंकला आहे.(Pro Kabaddi 2019: यू मुंबा संघाला धूळ चारत हरियाणा स्टीलर्स ठरला दमदार विजेता, प्रो कबड्डी 2019 पर्वात मिळवला पाचवा विजय)

Pro Kabaddi Twittet:

तर बंगळुरु बुल्स संघातील खेळाडूंनी सुद्धा सामना जिंकण्यासाठी प्रयत्न केला. मात्र आजचा सामन्यात त्यांना पराभव स्विकारावा लागला आहे. परंतु संघातील खेळाडू रोहित कुमार याने 7 रेड टाकत 7 गुण मिळवले. तसेच पवन कुमार याने 5 रेड टाकत 5 गुण एकट्याने संघाला मिळवून दिले आहेत. त्याचसोबत अमित, बंटी, सुमित सिंग आणि सुरभ नंदाल यांनी सुद्धा उत्तम खेळी केली.