(Photo Credits: IANS)

प्रो कबड्डी लीग (Pro Kabaddi) 7 च्या अंतिम सामन्यात बंगाल वॉरियर्स ने अहमदाबादच्या ट्रान्सॅटदेवच्या एकता अखाड्यात दबंग दिल्ली (Dabang Delhi) ला पराभूत केले. यासह बंगाल वॉरियर्स (Bengal Warriors) ने प्रथमच प्रो कबड्डी लीगचे जेतेपद जिंकले. मोहम्मद नबी बक्ष ठरला बंगालच्या विजयाचा नायक सुपर 10 मिळवला. सातव्या हंगामातील रोमांचकारी फायनलमध्ये बंगाल वॉरियर्सने दबंग दिल्लीचा 39-34 असा पराभव केला. दिल्लीचा संघ पहिल्या पाच मिनिटांसाठी 7-2 ने पुढे होता. त्यानंतर दिल्लीने पुढच्याच मिनिटाला बंगालला ऑल आऊट करत 11-3 अशी आघाडी मिळवून घेतली. पुढच्या 10 मिनिटांत बंगालने पुनरागमन केले आणि दिल्लीला ऑलआऊट करत स्कोअर 14-15 असा केला. बंगालचा संघ आता अवघ्या एका गुणाने मागे होता आणि 18 व्या मिनिटाला त्यांनी 16-16 अशी बरोबरी साधली. यानंतर बंगालने पहिल्यांदा मॅचमध्ये आघाडी मिळवली. पण, दिल्लीनेही एका गुणांसह 17-17 अशी बरोबरी साधली.

पहिल्या हाफमध्ये दिल्लीच्या नवीन कुमारने सहा आणि बंगालच्या मोहम्मद नबी बक्षने सात गुण घेतले. या दरम्यान मेराज शेख याने दिल्लीसाठी 350 रेड पॉईंट पूर्ण केले. दुसऱ्या हाफमध्ये देखील दोन्ही फलंदाजांमध्ये चांगली लढत पहायला मिळाली. दुसऱ्या हाफच्या पहिल्या पाच मिनिटांमध्ये दोन्ही संघ 19-19 अश्या बरोबरीत होते पण त्यानंतर बंगालने दिल्लीला ऑल आऊट करत 25-21 अशी आघाडी मिळवली. यादरम्यान दिल्लीच्या नवीनने या सीजनमध्ये 21 वा आणि एकूण 22 वा सुपर-10 पूर्ण केला. सामना संपण्याच्या 8 मिनिटांपूर्वी बंगाल संघाने पुन्हा दिल्लीला ऑल आऊट केले आणि 10 गुणांची महत्त्वपूर्ण आघाडी घेत स्कोअर 34-24 वर नेला.

बंगालने यानंतर आपली आघाडी कायम राखत दिल्लीला पुनरागमन करण्याची संधी दिली नाही आणि सामना 39-34 असा जिंकला आणि प्रथमच चॅम्पियन होण्याचा मान मिळविला.