Paris 2024 Paralympic Games: टोकियो 2020 पॅरालिम्पिक (Tokyo 2020 Paralympics)स्पर्धेत भारताला सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या प्रमोद भगत ( Pramod Bhagat) याच्यावर 18 महिन्यांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार प्रमोद भगतवर 18 महिन्यांच्या निलंबनामुळे प्रमोदला आगामी पॅरिस 2024 पॅरालिम्पिक स्पर्धेतही सहभाग घेता येणार नाही.
प्रमोद भगतवर ही कारवाई बॅडमिंटन महासंघाच्या अँटी-डोपिंग नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी झाली आहे. 1 मार्च 2024 रोजी, कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन ऑफ स्पोर्ट (CAS) डोपिंग विरोधी विभागाने केलेल्या पाहणीत भगत १२ महिन्यांत तीन डोप टेस्टमध्ये अयशस्वी ठरला. प्रमोद भगत SL3 या गटातून खेळतो. 29 जुलै मध्ये CAS अपील विभागाने त्याने केलेली याचिका फेटाळून लावली होती. त्याचा अपात्रतेचा कालावधी आता लागू झाला आहे. (हेही वाचा: Tokyo Paralympics 2020: प्रमोद भगत याला बॅडमिंटन मध्ये सुवर्ण पदक मिळाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कौतुक)
कोण आहे प्रमोद भगत?
प्रमोद भगत हा बिहार राज्यातील आहे. तो एक व्यावसायिक पॅरा-बॅडमिंटनपटू आहे. तो सध्या पॅरा-बॅडमिंटन पुरुष एकेरी SL3 मध्ये जागतिक क्रमवारीत 2 व्या क्रमांकावर आहे. टोकियो 2020 पॅरालिम्पिक पुरुष एकेरी SL3 स्पर्धेत भारताला सुवर्णपदक जिंकून दिले होते. त्याने त्याच्या अपंगत्वार मात करत सुवर्णपदकापर्यंत मजल मारली होती. पाच वर्षांचा असताना प्रमोद भगतला पोलिओ झाला होता. त्यामुळे भगतच्या डाव्या पायावर परिणाम होऊन तो अपंगत झाला.
UPDATE: Indian #Parabadminton #Tokyo2020 gold medallist Pramod Bhagat suspended for 18 months for breaching BWF anti-doping regulations with three whereabouts failures within 12 months. #Paris2024 #Paralympicshttps://t.co/YLdD7BWI5N
— BWF (@bwfmedia) August 13, 2024
वयाच्या 13 व्या वर्षी तो बॅडमिंटनचा सामना पाहण्यासाठी गेला आणि तिथे त्याला खेळाची भुरळ पडली. त्यानंतर प्रमोद भगतने दोन वर्षे फूटवर्क, फिटनेसवर काम केले. वायाच्या 15 वर्षी असताना त्याने सामान्य श्रेणीतील आयुष्यातील पहिली स्पर्धा खेळली. त्यानंतर त्याने त्याचा खेळाविषयीचा छंद कायम ठेवला.