Neeraj Chopra: नीरज चोप्रा कॉमनवेल्थ स्पर्धेतून बाहेर; भारताला मोठा धक्का
नीरज चोप्रा (Photo Credit: PTI)

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याने तंदुरीस्तीच्या कारणास्तव बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेतून (Birmingham Commonwealth Games) माघार घेतली आहे. ही स्पर्धा येत्या 28 जुलैपासून सुरु होणार आहे. स्पर्धा सुरु होण्यास अवघ्या 48 तासांचाच अवधी बाकी असताना निरजने माघार घेतल्याने त्याच्या चाहत्यांसह भारतीय क्रीडा वर्तुळाला धक्का बसला. पीटीआय या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे. शिवाय भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे सरचिटणीस राजीव मेहता (Rajeev Mehta) यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

नीरज चोप्रा याने ऑलिम्पिक सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर पुढे वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेतही त्याने रौप्यपदक जिंकत यूएसमध्ये भारताचा तिरंगा फडकावला. या पदकाच्या रुपात नीरजने भारताची प्रदीर्घ काळची प्रतिक्षा संपुष्टात आणली होती. कारण निरज याच्या रुपात भारताने तब्बल वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 19 वर्षांनी पदकाची कमाई केली.

ट्विट

दरम्यान, स्पर्धेच्या काळातच त्याच्या मांडीला दुखापत झाली. त्याला एक महिन्याच्या विश्रांतीचा सल्ला देण्यात आला. र्मिंगहॅम कॉमनवेल्थ स्पर्धा येत्या 28 जुलै ते 7 ऑगस्ट पर्यंत खेळली जाणार आहे.