पीव्ही सिंधूसह मानसी जोशी हिची ऐतिहासिक कामगिरी, Para-badminton World Championships जिंकणारी बनली पाहली भारतीय
मानसी जोशी (Photo Credit: @BPCLimited/Twitter)

भारताची बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू (PV Sindhu) हिच्या जागतिक विजेतेपदाबरोबर मानसी जोशी (Manasi Joshi) नेही भारतीय पॅरा बॅडमिंटनमध्ये सुवर्ण अक्षरात आपले नाव नोंदवले आहे. बासेल येथील वर्ल्ड पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या महिला एकेरीच्या एसएल-3 च्या अंतिम फेरीत मानसीने पारुल परमार हीच 21-12, 21-7 असा पराभव करून जेतेपद जिंकले. 2011 मध्ये एका अपघातात मानसीचा डावा पाय गमावला. त्या अपघाताच्या आठ वर्षांनंतर शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात त्याने तीन वेळा विश्वविजेती परमारचा पराभव केला. मानसी पुलेला गोपीचंद (Pulella Gopichand) यांच्या अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत आहे. आणि या स्पर्धेत भारताने तीन सुवर्ण आणि तीन रौप्यसह एकूण 14 पदकांची कमाई केली. पॅरालंपिक ऑफ इंडियाने मानसीचे या विजयाबद्दल अभिनंदन केले. (पी.व्ही. सिंधू ठरली 'जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशीप' ची मानकरी, स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू)

दरम्यान, प्रमोद भगत आणि मनोज सरकार यांनी पुरुष दुहेरी एसएल 3-4 प्रकारात अंतिम सामन्यात नितेश कुमार आणि तरुण ढिल्लन यांना 14-21, 21-15, 21-16 असे पराभूत करून सुवर्णपदक जिंकले. या चॅम्पियनशिपमधील भगतचे हे दुसरे सुवर्णपदक आहे. यापूर्वी त्याने पुरुष दुहेरी एसएल 3-4 चे विजेतेपदही जिंकले होते. रविवारी प्रमोद भगतने पुरुष एकेरीच्या एसएल 3 च्या अंतिम सामन्यात इंग्लंडच्या डॅनियल बेथलचा 6-21, 21-14, 21-5 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले तर पुरुष एकेरीच्या एसएल-4 च्या अंतिम सामन्यात त्याला फ्रान्सच्या लुकास मजूरकडून पराभवाला सामोरे जावे लागले.

दुसरीकडे, सिंधूने आज भारतीय बॅडमिंटनच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नावं कोरलं. जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत अंतिम सामन्यात सिंधूने जपानच्या निजोमी ओकुहारा हिचा 21-7, 21-7 असा एकतर्फी पराभव करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. 2017 मध्ये याच स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ओकुहाराने सिंधूला पराभत केले होते. यापूर्वी 1983 मध्ये प्रकाश पादुकोण यांनी वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीपमध्ये ब्राँझ पदक पटकावले होते.