कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टोकियो ऑलिम्पिक स्थगित होण्याच्या मार्गावर, 2021 मध्ये होणार खेळ
टोकियो ऑलिम्पिक (Photo Credit: Getty Images)

टोकियोमध्ये ऑलिम्पिक खेळ (Olympic Games) कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) पुढे ढकलण्यात येणार आहेत. ऑलिम्पिक खेळ एक वर्षासाठी स्थगित केले जाणार आहे. ज्याचा अर्थ असा आहे की आता ऑलिम्पिक खेळ 2021 मध्ये टोकियोमध्ये होणार आहेत. पहिल्यांदाच महामारीमुळे ऑलिम्पिक खेळ स्थगित करण्यात आले आहेत. यापूर्वी ऑलिम्पिक खेळ तीन वेळा रद्द करण्यात आले आहेत. पहिल्या विश्वयुद्धा दरम्यान ऑलिम्पिक प्रथम 1916 मध्ये रद्द करण्यात आले होते. त्यानंतर 1940 आणि 1944 दरम्यान दुसर्‍या महायुद्धामुळे ऑलिम्पिक खेळ खेळले गेले नाहीत. अद्याप याची अधिकृत घोषणा झालेली नसली तरी लवकरच जाहीर केली जाईल. जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांनीही ऑलिम्पिक पुढे ढकलण्यास बांधील असल्याचे स्पष्ट केले आहे. आयओसीचे वरिष्ठ अधिकारी डिक पौंड (Dick Pound) यांनी यूएसए टुडे स्पोर्ट्सला सांगितले की ऑलिम्पिक खेळ पुढे ढकलले जातील, उर्वरित तपशिला पुढील चार आठवड्यांत पूर्ण होतील. (Tokyo Olympics 2020: ऑस्ट्रेलिया-कॅनडा देशांनी टोकियो ऑलिम्पिकमधून घेतली माघार, कोरोना व्हायरसचा धोका पाहत खेळाडूंना पाठवण्यास दिला नकार)

ते म्हणाले, “उपलब्ध माहितीनुसार आयओसीने ऑलिम्पिक खेळ पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. मी असे म्हणू शकतो की ऑलिम्पिक खेळ 24 जुलैपासून सुरू होणार नाहीत." बर्‍याच काळापासून कोरोना व्हायरस हा टोकियो ऑलिम्पिकसाठी धोकादायक म्हणून सिद्ध होत होता, पण जपान ऑलिम्पिक समिती आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती वेळेवर खेळांचे आयोजन करण्याविषयी बोलत होते, परंतु आता कोरोनाचा जगभर होणार प्रभाव पाहता त्यांना खेळ स्थगित करण्याचा निर्णय घ्यावा लागला. खेळ पुढील वर्षी होणार असून त्याची तारीखही लवकरच जाहीर केली जाईल.

यापूर्वीच कॅनडा आणि ऑस्ट्रेलियासारख्या बड्या देशांनी कोरोना विषाणूमुळे ऑलिम्पिकमधील नावे मागे घेतली होती. शिवाय, अनेक प्रसिद्ध स्पोर्ट्स फेडरेशन आधीपासूनच ऑलिम्पिक पुढे ढकलण्याची मागणी करत होते. दुसरीकडे, जगभरात 3.70 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर 16 हजार लोकांनी आपले प्राण गमावले आहे. जपानमध्येही ऑलिम्पिक समितीच्या अधिकाऱ्यासह 1,700 हून अधिक लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे.