टेबल टेनिस | प्रतिनिधित्व प्रतिमा (Photo Credit: Getty)

भारताचे माजी राष्ट्रीय टेबल टेनिस (Table Tennis) चॅम्पियन मनमीत सिंह वालिया (Manmeet Singh Walia) यांचे कॅनडाच्या मॉन्ट्रियल येथे सोमवारी दीर्घ आजाराने निधन झाले. मनमीत 58 वर्षांचे होते. 1988-89 मध्ये हैदराबादमध्ये एकट्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद मिळवणारे मनमित एक वर्षांपासून अमिओट्रोफिक लेटरल स्क्लेरोसिसने (Amyotrophic Lateral Sclerosis) त्रस्त होते. या रोगात स्नायू कमकुवत होतात आणि शरीराच्या हालचालींवर परिणाम होत. त्यांच्या पश्चात पत्नीशिवाय दोन मुली असा परिवार आहे. 1980 च्या दशकात भारतीय टेबल टेनिसमध्ये मनमीत सर्वात सुसंगत आणि प्रभावी कामगिरी करणारे होते आणि त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले. नॅशनल्समध्ये 1981 पासून सलग चार वेळा अंतिम फेरीत मनमीतचा दुर्दैव पराभव झाला होता. मात्र, त्यांनी हैदराबादमध्ये 1988-89 मध्ये अंतिम फेरीत एस. श्रीरामचा पराभव करत विजय नोंदवला. 1990 च्या उत्तरार्धात निवृत्त झाल्यानंतर मनमीत कॅनडामध्ये परत गेले.

1980 च्या दशकात सिंह हे कमलेश मेहता, मनजीत दुआ, बी अरुण कुमार आणि व्ही. चंद्रशेखर यांच्यासह भारतीय संघाचे सातत्याने सदस्य होते. 1980 च्या कोलकाता येथे झालेल्या आशियाई टेबल टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील भारताच्या 5-4 पराभवातील उत्तर-कोरियाच्या दोन टॉप-टेबल टेनिसपटूंविरूद्ध त्याने केलेल्या प्रभावी कामगिरीबद्दल अजूनही टेबल टेनिस विश्वात प्रख्यात आहे.

माजी संघातील सहकारी आणि भारतीय दिग्गज मेहता म्हणाले की, सिंह त्या काळातील एक सर्वोत्कृष्ट खेळाडू होते. “त्याने आणि मी कोलकाता आशियाई स्पर्धेत एकत्र पदार्पण केले. फक्त चंद्र, अरुण आणि मनमीत यांना उत्तर कोरियाच्या विरुद्ध सामना खेळायला मिळाला. आणि, मनमीतचे (कामगिरी) महत्त्वपूर्ण होते कारण त्याने आपले दोन्ही रब जिंकले आणि भारताला आघाडी मिळवून दिली. चँपियनशिपमध्ये भारत पाचव्या क्रमांकावर आहे, ”असे मेहता यांनीपीटीआयनुसार सांगितले.