
भारतीय पैलवान बजरंग पुनिया (Bajrang Punia) याची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. बजरंग याने कॉमनवेल्थ आणि एशियाड स्पर्धेत सुवर्णपदक भारताला मिळवून दिले आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावाने खेलरत्न पुरस्कार देण्यात येतो. तसेच या पुरस्काराला क्रीडाक्षेत्रात मोठा मान आहे.
केंद्र शासनाने बारा सदस्यीय समितीने बजरंग यांची खेलरत्न पुरस्कारासाठी निवड केली आहे. येत्या 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त खेलरत्न, अर्जुन आणि द्रोणाचार्य क्रीडा पुरस्काराचे वितरण होणार आहे.(फोगाट कुटुंबात पुन्हा वाजणार सनई-चौघडे, बजरंग पुनिया आणि संगीता फोगाट यांचा होणार शुभमंगल सावधान)
गौरव केलेल्या खेळाडूला सात लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र देण्यात येते. आतापर्यंत सुशीलकुमार, योगेश्वर दत्त आणि साक्षी मलिक यांना खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. गेल्या वर्षी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि वेटलिफ्टर मीराबाई चानू हिला खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.