भारतीय संघाने (Indian Team) आज पुन्हा एकदा पाकिस्तान (Pakistan) संघाला दणका दिला आहे. पण, क्रिकेटच्या मैदानात नाही तर वॉलीबॉलच्या मैदानात. 13 व्या दक्षिण आशियाई खेळाच्या (South Asian Games) वॉलीबॉल फायनलमध्ये पाकिस्तानचा 20-25, 25-15, 25-17, 29-27 ने पराभव केला आणि 3-1 ने सामना जिंकत पुन्हा एकदा सुवर्णपदकाची कमाई केली. भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळलेला प्रत्येक सामना उत्साहवर्धक असतो. यंदाचा सामनाही मनोरंजक राहिला. पाकिस्तानने पहिला सेट जिंकून भारतावर दबाव आणला. पण, पाकिस्तान चांगला खेळ करू शकले नाही आणि भारताने नंतरचे 3 सेट गमावले. पाकिस्तानने चौथ्या सेटमध्ये चांगली झुंज दिली, पण सामना वाचवू शकले नाही. यासह भारतीय संघाने सुवर्णपदक जिंकले, तर पाकिस्तानला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
यापूर्वी, 12 व्या आशियाई स्पर्धेच्या फायनलमध्ये भारतीय संघाने विजेतेपद जिंकले होते. मंगळवारी गतविजेते म्हणून भारतीय संघ पाकिस्तानशी जेतेपद मिळवण्याच्या निर्धाराने उतरेल. पुरुष आणि महिला संघाने यापूर्वी या दोन्ही स्पर्धांमध्ये भारतासाठी जेतेपद जिंकले होते. यंदाही देखील भारताच्या पुरुष आणि महिला संघाने व्हॉलीबॉल फायनलमध्ये प्रवेश मिळविला आहे. भारत आणि पाकिस्तान संघांनी शानदार खेळ दाखवून उपांत्य फेरीत विजय मिळवला होता. भारताने श्रीलंकेला तर पाकिस्तानने बांग्लादेशला पराभूत केले होते. दुसरीकडे, भारताची महिला संघ यजमान नेपाळ संघाविरुद्ध अंतिम सामना खेळेल. सेमीफायनलमध्ये भारताच्या महिला संघाने मालदीवचा पराभव केला होता.अलीकडेच भारतीय संघाने पाकिस्तान डेव्हिस कप टेनिस सामन्यात पराभव केला होता, 29 आणि 30 नोव्हेंबरला डेव्हिस कपमध्ये खेळल्या गेलेल्या एकतर्फी सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभूत केले. जिंकल्यानंतर भारताला वर्ल्ड ग्रुपमध्ये स्थान मिळवले आहे.
अलीकडेच भारतीय संघाने पाकिस्तान डेव्हिस कप टेनिस सामन्यात पराभव केला होता, 29 आणि 30 नोव्हेंबरला डेव्हिस कपमध्ये खेळल्या गेलेल्या एकतर्फी सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभूत केले. जिंकल्यानंतर भारताला वर्ल्ड ग्रुपमध्ये स्थान मिळवले आहे.