IND v SA 2022: ODI मालिका जिंकल्यानंतर टीम इंडियाचा जल्लोष, 'बोलो तारा रा रा' गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल
Team India Viral Video | (Photo Credits-Instagram)

दिल्ली येथीलल अरुण जेटली स्टेडियमवर (Arun Jaitley Stadium) खेळल्या गेलेल्या तीन एकदिवसीय मालिकेतील अखेरच्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा (IND v SA 2022) सात गडी राखून पराभव केला. या विजयासह भारताने मालिका 2-1 ने जिंकली. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि विजयी कामगिरी केली. या विजयानंतर टीम इंडियाचा एक व्हिडिओ व्हायरल ( Team India Viral Video) झाला आहे. ज्यात दलेर मेहंदी (Daler Mehndi) याच्या बोलो तारा रा रा..' (Bolo Tara Ra Ra) गाण्यावर टीम इंडियाचे खेळाडू डान्स करताना पाहायला मिळत आहेत.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा भारताचा निर्णय योग्य ठरला. फलंदाजीला आलेला आफ्रिकन संघ अवघ्या 100 धावांत गारद झाला. कुलदीप यादवच्या फिरकीसमोर एसएचे खेळाडू मोठ्या प्रमाणावर हतबल होताना दिसले. दुसऱ्या बाजूला, भारतीय संघाने 19.1 षटकांत तीन गडी गमावून लक्ष्य सहज गाठले आणि मालिका 2-1 अशी जिंकली. त्यानंतर, एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर भारतीय खेळाडू जल्लोषात नाचताना दिसले. व्हायरल झालेल्या व्हिडिओत पाहायला मिळते की, टीम इंडियाचे खेळाडू दलेर मेहंदीच्या लोकप्रिय पंजाबी ट्रॅक ‘बोलो तारा रा रा..’वर नाचताना दिसले. कॅप्टन शिखर धवनसह संपूर्ण टीम मोठ्या आवेशात गातानाही दिसली. (हेही वाचा, Rohit Sharma: मुंबई इंडियन्सने शेअर केला रोहित शर्माची व्हिडिओ, कॅप्टन म्हणाला डाॅन्स नाही करणार आणि मग केलं असं (Watch Video))

ट्विट

 

View this post on Instagram

 

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial)

उल्लेखनीय असे की, शिखर धवन खेळाडूंसोबत नृत्य करताना विविध रील्स सोशल मीडियावर शेअर अनेकदा दिसतो. आताही टीम इंडियाचा सेलिब्रेशन करतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर लोकही उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत आहेत. आजच्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, कर्णधार शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारताने अंतिम आणि निर्णायक सामन्यात आफ्रिकेचा 7 गडी राखून पराभव केला.