भारतीय शटलर सायना नेहवाल (Saina Nehwal) हिला हाँगकाँग ओपन (Hong Kong Open) च्या दुसर्या दिवशी महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. सायनाला पहिल्या फेरीत चिनी खेळाडू कै यान यान (Cai Yan Yan) ने 13-21, 20-22 असं सलग सेटमध्ये पराभूत केले. दोन्ही खेळाडूंमधील या सामन्यात चिनी खेळाडूने सायनाला फक्त 30 मिनिटात पराभूत केले आणि दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला. पुरुष ऐकेरीत समीर वर्मा (Sameer Verma) याचेही आव्हान पहिल्या फेरीत संपुष्टात आले आहे. तैवानच्या जगातील 26 व्या क्रमांकावर असलेल्या वांग त्झू वेई (Wang Tzu Wei) याने समीरला 11-21, 21-13, 8-21 ने पराभूत केले. पहिल्या गेममध्ये सायना चिनी खेळाडूविरुद्ध चांगला खेळ करू शकली नाही आणि पहिला गेम 13-21 ने गमावला. दुसऱ्या गेममध्ये सायनाने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण चिनी खेळाडूने तिला कोणतीही संधी दिली नाही. सायनाने सकारात्मक खेळायला सुरुवात केली आणि लवकर आघाडी घेतली पण, यानने पुन्हा 4-6 अशी आघाडी घेतली आणि मग ते 18-14 पर्यंत पुढे गेली.
चिनी खेळाडूला झुंज देत 29 वर्षीय सायनाने सलग पाच गन मिळवत पुन्हा आघाडी घेतली. पण, 20-19 ने सायनाने चिनी खेळाडूला गेम पॉइंटला. काईने नंतर 3 गन घेत 22-20 ने मॅच जिंकली आणि पुढील फेरीत प्रवेश मिळवला. नेहवाल आता सलग दोन टूर्नामेंटमध्ये पहिल्या फेरीत दुसऱ्यांदा चिनी खेळाडूंकडून पराभूत झाली आहे. सायनाला मागील आठवड्यात फुझहू येथे चायना ओपनमध्ये 9-21, 12-21 ने पराभवाला सामोरे जावे लागले होते. विशेष म्हणजे, जागतिक क्रमवारीत 9 व्या स्थानावरील सायना आता तिच्या शेवटच्या सहा स्पर्धांपैकी पाच स्पर्धांमध्ये पहिल्या फेरीत पराभूत झाली आहे. ऑगस्टमध्ये झालेल्या वर्ल्ड चॅम्पियननंतर सायना चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरली आहे. सायनाने यंदा इंडोनेशिया ओपन स्पर्धा जिंकली आहे.
पुरुष एकेरीच्या सामन्यात समीर वर्माचा तैवानच्या त्सु वे वांगने तीन सामन्यांच्या लढाईत पराभव केला. वांगने समीरचा 11-21 21-13 8-21 ने पराभव केला.