दंगल गर्ल गीता फोगाट आई होणार; Instagram वर भावनिक पोस्ट शेअर करत दिली माहिती, वाचा पोस्ट
गीता फोगाट (Photo Credit: facebook)

भारताची नामांकित महिला कुस्तीगीता गीता फोगाट (Geeta Phogat) आई बनणार आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक खास संदेश पोस्ट केला आणि ही आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली. 2010 राष्ट्रकुल स्पर्धेत गीताने भारतासाठी सुवर्णपदक जिंकले असून याशिवाय कॉमनवेल्थ चैंपियनशिपमध्ये दोन सुवर्ण पदके जिंकली आहेत. नोव्हेंबर 2016 मध्ये गीताने कुस्तीपटू पवन कुमार (Pawan Kumar) याच्याशी लग्न केले. गीता इन्स्टाग्रामवर तिचा प्रेग्नन्सी फोटो शेअर करत तिने लिहिले की,"जेव्हा आपल्यात नवीन जीवन वाढते तेव्हा आपण आई होण्यात आनंद घेता. जेव्हा तिची पहिली थाप ऐकू येते आणि पोटातील किक जाणवून देते की तो कधीही एकटा नसेल. तुम्ही या जीवनाला तो पर्यंत नाही समजू शकत, जो पर्यंत ती तुमच्या आत वाढत नाही."

गीता काही काळ कुस्तीपासून दूर होती. गीताच्या सुवर्णजीवनावर एक चित्रपट 'दंगल' (Dangal) देखील तयार झाला आहे. हा चित्रपट खूप लोकप्रिय झाला होता. या चित्रपटात गीताची भूमिका फातिमा सना शेख यांनी केली होती, तर बालपणच्या गीताची भूमिका झयरा वसीम हिने साकारली होती, ज्याने आता हिंदी चित्रपटसृष्टी सोडली आहे.